राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तर मॅसिडोनियाच्या लोकप्रतिनिधीगृहाला केले संबोधित

प्रविष्टि तिथि: 21 JUL 2026 10:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,21 जुलै 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (21 जुलै 2026) स्कोप्ये येथे उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती डॉ.गोर्डाना सिलजानोव्स्का-दावकोवा यांच्या उपस्थितीत उत्तर मॅसेडोनियाच्या लोकप्रतिनिधीगृहाच्या सदस्यांना संबोधित केले.

भारत उत्तर मॅसेडोनिया प्रजासत्ताकाकडे केवळ एक दूरचा देश म्हणून पाहत नाही, तर स्थिर, बहुध्रुवीय आणि समृद्ध जागतिक भविष्याच्या निर्माणातील एक महत्त्वपूर्ण स्तंभ मानतो, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी सांगितले.  आपल्या संबंधांची सुरुवात दोन सहस्रकांहून अधिक काळापूर्वी झाली होती, असे त्यांनी नमूद केले. 

नवी दिल्ली आणि स्कोप्ये दरम्यान प्रवासाचे, तसेच संसदीय कार्यपद्धती व सार्वजनिक धोरण निर्मितीमधील सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान करण्याचे आवाहन त्यांनी युवा लोकप्रतिनिधींना केले. 

भौगोलिक-राजकीय आणि आर्थिक शक्तींची केंद्रे बदलत असल्याचे राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. या नव्या युगात भारत आग्नेय युरोपकडे केवळ परिघावरील प्रदेश म्हणून पाहत नाही, तर विकास आणि नवोन्मेष उपक्रमांचे एक गतिमान केंद्र म्हणून पाहतो, असे त्या म्हणाल्या. 

कोणतेही राष्ट्र एकाकी राहून प्रगती करू शकत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. भारताच्या प्राचीन संस्कृतीचे तत्त्वज्ञान 'वसुधैव कुटुंबकम्'  या शाश्वत सिद्धांतावर आधारलेले आहे. जग संघर्ष आणि आर्थिक विभाजनाचा सामना करत असताना हे  तत्त्वज्ञान,  भिंती उभारण्याऐवजी परस्पर संबंधांचे पूल बांधण्याचे आवाहन करते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. इतिहासाचा भक्कम पाया  असलेली आणि उज्ज्वल भविष्याचा सामायिक दृष्टिकोन असलेली  दोन लोकशाही राष्ट्रे म्हणून, आपण एकत्रितपणे अशी वाटचाल केली पाहिजे जी आपल्या जनतेसाठी शांतता आणि समृद्धीदायी असेल असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले. 

राष्ट्रपतींच्या भाषणासाठी येथे क्लिक करा. 

निलीमा चितळे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2287486) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati , Malayalam