पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जपान ओपन 2826 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल पीव्ही सिंधूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  केले अभिनंदन

Posted On: 19 JUL 2026 7:13PM by PIB Mumbai

 

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने जपान ओपन 2026 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिचे अभिनंदन केले. ही ऐतिहासिक कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. संपूर्ण स्पर्धेत पीव्ही सिंधूचा दृढनिश्चय आणि विलक्षण कौशल्ये ठळकपणे दिसून आली, असे पंतप्रधान म्हणाले. तीची कामगिरी देशभरातील असंख्य तरुण खेळाडूंना खेळण्यासाठी प्रेरणा देत राहील, असेही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

भारतीय बॅडमिंटनसाठी एक ऐतिहासिक कामगिरी!

जपान ओपन 2026 मध्ये विजयी झाल्याबद्दल पीव्ही सिंधूचे अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेत तिचा दृढनिश्चय आणि विलक्षण कौशल्ये ठळकपणे दिसून आली. हे विजेतेपद जिंकणारी ती पहिली भारतीय आहे, त्यामुळे तिची कामगिरीला आणखी विशेष बनली आहे. तीची कामगिरी देशभरातील असंख्य तरुण खेळाडूंना खेळण्यासाठी प्रेरणा देत राहील.

@Pvsindhu1

***

माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2286364) अभ्यागत कक्ष : 57