दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल विभागाने इनोव्हेट इंडिया माय-जिओव्ही प्लॅटफॉर्मवर शुभंकर आरेखन स्पर्धेचा केला प्रारंभ
विश्वास, सेवा आणि डिजिटल नवोन्मेष या भारतीय टपाल विभागाच्या मूल्यांचे प्रतिबिंब दर्शवणारा अधिकृत शुभंकर आरेखित करण्यासाठी नागरिकांना केले आमंत्रित; एकूण 2 लाख रुपयांची बक्षीसे जिंकण्याची संधी
प्रविष्टि तिथि:
18 JUL 2026 12:33PM by PIB Mumbai
दूरसंचार मंत्रालयाच्या टपाल विभागाने, इनोव्हेट इंडिया मायजीओव्ही प्लॅटफॉर्मवर ‘इंडिया पोस्ट शुभंकर आरेखन स्पर्धा’ सुरू केली आहे. भारतीय टपाल विभागाचा अधिकृत शुभंकर आरेखित करण्यासाठी देशभरातील नागरिकांना या स्पर्धेत आमंत्रित करण्यात आले आहे. टपाल विभागाची विश्वास, विश्वसनीयता, सर्वसमावेशकता, सेवा आणि डिजिटल नवोन्मेष ही मूलभूत मूल्ये प्रतिबिंबित करणारा एक वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड अँबेसिडर (शुभंकर) तयार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
ही स्पर्धा सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. सहभागींनी मायजीओव्ही प्लॅटफॉर्मवर एक मूळ शुभंकर आरेखन, शुभंकराचे एक योग्य नाव आणि त्यामागील संकल्पना स्पष्ट करणारी संक्षिप्त टीप सादर करणे आवश्यक आहे. ही स्पर्धा 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2026 पर्यंत खुली राहील.
सर्जनशील सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, विभागाने सर्वोत्कृष्ट तीन शुभंकर आरेखनासाठी - रोख बक्षीस
प्रथम क्रमांक - 75 हजार रुपये.
द्वितीय क्रमांक पन्नास हजार रुपये, आणि
तृतीय क्रमांक 25 हजार रुपये.
सर्वोत्कृष्ट तीन शुभंकर नावांकरिता - रोख बक्षीस
प्रथम क्रमांक - 25 हजार रुपये
द्वितीय क्रमांक - 15 हजार रुपये
तृतीय क्रमांक - 10 हजार रुपये
सर्व विजेत्यांना प्रमाणपत्रे देखील प्रदान केली जातील. शुभंकर आरेखन आणि शुभंकर नामकरण या स्पर्धा स्वतंत्र असून त्यांची बक्षिसेही स्वतंत्र असतील.
निवडलेला शुभंकर भारतीय टपाल विभागाचा अधिकृत ब्रँड ॲम्बेसेडर बनेल आणि त्याला प्रचारात्मक मोहिमा, टपाल तिकीट उत्पादने, जनजागृती उपक्रम, प्रदर्शने, विविध समाज माध्यमे आणि इतर अधिकृत संवादांमध्ये स्थान दिले जाईल.
विभागाने देशभरातील विद्यार्थी, डिझाइनर, कलाकार आणि सर्जनशील व्यावसायिकांना भारतीय टपाल विभागाची भविष्यातील दृश्य ओळख घडवण्यासाठी सहभागी होण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
स्पर्धेचे मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटी यांसह संपूर्ण तपशिलासाठी आणि प्रवेशिका सादर करण्यासाठी, सहभागी खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकतात:
https://innovateindia.mygov.in/mascot-design-contest-for-india-post/
Scan
QR Code
for Link:


***
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2286069)
आगंतुक पटल : 7