राज्यसभा सचिवालय
राज्यसभेचे सभापती सी.पी.राधाकृष्णन यांनी आज नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली
Posted On:
15 JUL 2026 3:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,15 जुलै 2026
राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात मन्सूर अली खान आणि रजनीश कुमार अग्रवाल या दोन नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.
64KR.jpeg)
मन्सूर अली खान यांनी इंग्रजीतून, तर रजनीश कुमार अग्रवाल यांनी हिंदीतून शपथ घेतली. हे दोन सदस्य अनुक्रमे कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांतील आहेत.

याप्रसंगी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश; संसदीय कार्य आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री एल. मुरुगन; राज्यसभेचे सदस्य जयराम रमेश; राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी आणि सचिवालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
X8AM.jpeg)

शैलेश पाटील/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2284817)
अभ्यागत कक्ष : 43