केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षा – 2025

प्रविष्टि तिथि: 15 JUL 2026 8:56AM by PIB Mumbai

1.संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षा 2025 चा निकाल 29.10.2025 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला होता. या पत्रकात, गुणवत्तेच्या क्रमवारीनुसार 80 उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती.

2. संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षा 2025 च्या नियम 16 (iv) आणि (v) च्या अनुषंगाने, आयोगाने, शिफारस केलेल्या शेवटच्या उमेदवाराच्या खाली, गुणवत्तेच्या क्रमाने एकत्रित राखीव यादी देखील तयार ठेवली होती.

3. आता, खाण मंत्रालयाने केलेल्या विनंतीनुसार, आयोग, राखीव यादीतील उमेदवारांमधून 16 उमेदवारांची शिफारस करत आहे, यापैकी 13 उमेदवार 'वैज्ञानिक 'बी' (हायड्रोजिओलॉजी), गट 'अ' / सहाय्यक हायड्रोजिओलॉजिस्ट, गट 'ब'' या पदांसाठी आहेत. श्रेणीनिहाय हे उमेदवार या नुसार  आहेत -सर्वसाधारण श्रेणीतील 4इतर मागासवर्गीय श्रेणीतील 7आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) श्रेणीतील  1, आणि अनुसूचित जाती श्रेणीतील (एससी) 1. 'जिओफिजिसिस्ट, गट 'अ' / वैज्ञानिक 'बी' (जिओफिजिक्स), गट 'अ' / सहाय्यक जिओफिजिसिस्ट, गट 'ब'' या पदांसाठी 3 उमेदवार असून यात, सर्वसाधारण श्रेणीतील 2आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) श्रेणीतील  1 उमेदवाराचा समावेश आहे. या उमेदवारांची यादी सोबत जोडली आहे. या शिफारस केलेल्या उमेदवारांशी खाण मंत्रालय थेट संपर्क साधेल.

4. खालील 3 उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती/अटींच्या अधीन आहे:-

अटींच्या अधीन :- 0390013

तात्पुरती – 1090492 आणि 0290224

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा:

***

AshishSangle / SavitaMhaskar / DineshYadav
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2284705) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu