गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद महानगरपालिका , स्वयंसेवक आणि गांधीनगर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचे केले अभिनंदन; 'मियावाकी' पद्धतीने अवघ्या एका तासात 3.61 लाखांहून अधिक रोपट्यांची लागवड करत रचला 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'
प्रविष्टि तिथि:
12 JUL 2026 7:59PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह व सहकार मंत्री तसेच गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमित शाह यांनी आज अहमदाबाद महानगरपालिका, या मोहिमेत सहभागी झालेले २५ हजारांहून अधिक स्वयंसेवक आणि गांधीनगर मतदारसंघातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले. 'मियावाकी' पद्धतीचा वापर करून अवघ्या एका तासात तब्बल 3 लाख 61 हजारांपेक्षा जास्त रोपट्यांची लागवड करत एक नवा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' रचल्याबद्दल त्यांनी हे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज पर्यावरण संवर्धनाला एका लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे, असे अमित शाह यांनी यावेळी नमूद केले. 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेने देशभरातील कोट्यवधी नागरिकांना निसर्ग रक्षणाच्या या उपक्रमाशी जोडले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत गांधीनगर लोकसभा मतदारसंघाने या चळवळीत एक नवी ऊर्जा निर्माण केल्याचे ते म्हणाले.
मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या एका तासात 3 लाख 61 हजारांहून अधिक रोपट्यांची लागवड करत 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' प्रस्थापित करणे, हे लोकसहभाग, सूक्ष्म नियोजन आणि पर्यावरण संवर्धनाप्रती असलेल्या सामाजिक कटिबद्धतेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. या उल्लेखनीय कामगिरीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांनी अहमदाबाद महानगरपालिका, या मोहिमेशी जोडलेले सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, 25 हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक आणि मतदारसंघातील जनतेचे विशेष कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
***
सुषमा काणे/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2283955)
आगंतुक पटल : 12