महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या यजमानपदात कोची येथे 8-9 जुलै 2026 दरम्यान ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठकीचे आयोजन


भारताच्या 'ब्रिक्स' (BRICS) अध्यक्षतेखाली, 'ब्रिक्स' सदस्य देशांचे मंत्री महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठीचा सामायिक दृष्टीकोन पुढे नेणार

प्रविष्टि तिथि: 07 JUL 2026 10:17AM by PIB Mumbai

भारताच्या ब्रिक्स (BRICS) 2026 अध्यक्षतेखाली, 8-9 जुलै 2026 रोजी केरळमधील कोची येथे ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री आणि शिष्टमंडळ प्रमुख परस्परांबरोबरचे सहकार्य मजबूत करण्यासाठी, महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी एकत्र येतील आणि समावेशक, लवचिक आणि शाश्वत विकासाप्रति सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतील.

भारताचे ब्रिक्स (BRICS) अध्यक्षपद लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या चार प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. या प्रत्येक पैलूमध्ये महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी 'ब्रिक्स वुमन ट्रॅक'ची रचना करण्यात आली आहे.

6-7 जुलै 2026 रोजी होत असलेल्या 'ब्रिक्स महिला कार्यगटा'च्या बैठकीनंतर ही मंत्र्यांची बैठक होत आहे. त्या आधीच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'ब्रिक्स महिला ट्रॅक' अंतर्गत असलेल्या प्राधान्य क्षेत्रांवर सविस्तर चर्चा केली.

'महिला कार्यगटा'ने (Women Working Group) घातलेल्या भक्कम पायावर आधारित प्रस्तावित परिणामांवर मंत्री चर्चा करतील आणि ब्रिक्स सदस्य देशांमधील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी धोरणात्मक दिशा निश्चित करतील.

'लोकाभिमुख आणि मानवतेला प्राधान्य देणारा दृष्टिकोन' दर्शवणाऱ्या भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या "लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी", या संकल्पनेवर आधारित ही मंत्रीस्तरीय बैठक, महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणे, आर्थिक संधींचा विस्तार, डिजिटल आणि आर्थिक समावेशन मजबूत करणे, उद्योजकतेला चालना देणे आणि हवामान कृती, अन्न सुरक्षा आणि पोषण यामधील महिलांच्या योगदानाला मान्यता देणे यासारख्या मुद्द्यांवरील उच्च-स्तरीय संवादासाठीचे व्यासपीठ म्हणून काम करेल. या चर्चेतून व्यावहारिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या आणि लैंगिक समानतेच्या दिशेने प्रगतीला गती देण्याच्या ब्रिक्स सदस्य देशांच्या सामायिक आकांक्षा प्रतिबिंबित होतील.

या मंत्रीस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर, ग्रामीण विकास, 'स्टेम' (STEM), पोषण, शिक्षण आणि इतर विविध क्षेत्रांमधील महिलांच्या नेतृत्वाखालील विकासात भारताने केलेली कामगिरी दाखवणारी प्रदर्शनेही आयोजित केली जातील.

या कार्यक्रमात एक पूर्ण सत्र आणि नामवंत तज्ञ, धोरणकर्ते आणि अभ्यासक यांच्या मार्गदर्शनाखाली विषय-आधारित पॅनेल चर्चांचाही समावेश असेल, यामुळे महिला सक्षमीकरणासाठी अनुभवांची देवाणघेवाण करण्याची, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन मांडण्याची आणि भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल.

***

NitinFulluke / RajashreeAgashe / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2281958) आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam