पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामायिक केले नम्रता आणि निस्वार्थ सेवेच्या सद्गुणांचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित
Posted On:
07 JUL 2026 10:01AM by PIB Mumbai
समृद्धीचे खरे सौंदर्य हे नम्रता आणि निःस्वार्थ सेवेमध्ये दडलेले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. यश हे तेव्हाच अर्थपूर्ण ठरते, ज्यावेळी ते सार्वजनिक कल्याण आणि समाजाच्या कल्याणाच्या भावनेने प्रेरित असेल, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले
“भवन्ति नम्रास्तरवः फलोद्गमैर्नवाम्बुभि-र्दूर-विलम्बिनो घनाः। अनुद्धताः सत्पुरुषाः समृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम्॥”
या सुभाषितामधून असा संदेश मिळतो की, ज्याप्रमाणे फळांनी लगडलेली झाडे आणि पावसाने भरलेले ढग जमिनीच्या दिशेने झुकतात, त्याचप्रमाणे परोपकारी आणि उदात्त आत्मे संपत्ती आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतरही नम्र राहतात. यशाचा गर्व न करता, ते आपले जीवन समाजाच्या उद्धारासाठी समर्पित करतात.
पंतप्रधानांनी 'एक्स' वर लिहिले
समृद्धीचे सौंदर्य नम्रता आणि परोपकारामध्ये दडलेले आहे. यश तेव्हाच अर्थपूर्ण ठरते, ज्यावेळी त्यामध्ये लोककल्याणाच्या भावनेला सर्वोच्च प्राधान्य असते.
भवन्ति नम्रास्तरवः फलोद्गमैर्नवाम्बुभि-र्दूर-विलम्बिनो घनाः।
अनुद्धताः सत्पुरुषाः समृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम्॥”
***
NitinFulluke / ShaileshPatil / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2281928)
अभ्यागत कक्ष : 43
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam