उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींकडून विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) अंतर्गत मतदार यादी गणना फॉर्म सादर; पात्र मतदारांना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन
अचूक आणि अद्ययावत मतदार यादी ही भारताच्या सशक्त लोकशाहीला बळकटी देण्यासाठी अत्यावश्यक : उपराष्ट्रपती
विशेष सघन पुनरावलोकन प्रक्रियेसाठी जनतेच्या सहकार्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2026 12:50PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) अंतर्गत आपला पूर्ण भरलेला गणना फॉर्म सादर केला.
दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी अशोक कुमार आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकनाचा भाग म्हणून उपराष्ट्रपती भवन येथे गणना प्रक्रिया सुलभ केली.
यावेळी उपराष्ट्रपतींनी सर्व पात्र मतदारांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. अचूक आणि अद्ययावत मतदार यादी राखणे हे भारताच्या सशक्त लोकशाहीला अधिक बळकटी देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष सघन पुनरावलोकन यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी निवडणूक यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
***
हर्षल अकु़डे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2281030)
आगंतुक पटल : 10