अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन चार दिवसांच्या फ्रांसच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना

प्रविष्टि तिथि: 01 JUL 2026 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2026

 

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन आज चार दिवसांच्या फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना झाल्या. या दौऱ्यात त्या अनेक उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठकांमध्ये सहभागी होणार असून भारत - फ्रांस यांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासह आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करणे, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्य आणि नवोन्मेषाला चालना देण्याच्या दृष्टीने या भेटीगाठींमध्ये भर देण्यात येईल.

या दौऱ्यादरम्यानचा एक महत्त्वाचा कार्यक्रम असलेल्या भारत- फ्रांस आर्थिक आणि वित्तीय संवादाचे सह-अध्यक्षपद निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे आर्थिक, वित्त आणि औद्योगिक आणि  ऊर्जा सार्वभौमत्व मंत्री रोलँड लेस्क्यूर हे एक्स-एन-प्रोव्हान्स येथे भूषवतील.

वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे आर्थिक, वित्त आणि औद्योगिक आणि ऊर्जा सार्वभौमत्व मंत्री रोलँड लेस्क्यूर हे एक्स-एन-प्रोव्हान्स येथे आयोजित भारत-फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय संवाद या कार्यक्रमाचे सहाध्यक्षपद भूषवतील. हा कार्यक्रम या दौऱ्यातील महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आर्थिक आणि वित्तीय संवाद कार्यक्रमाचा भाग म्हणून दोन्ही नेते विविध क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य करण्यासाठीच्या क्षमतांवर तसेच भारत आणि फ्रांस यांच्यातील आर्थिक संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात चर्चा करतील

या दौऱ्यादरम्यान केंद्रीय वित्तमंत्री निवडक जागतिक कंपन्यांच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत वैयक्तिक बैठका घेणार असून भारताचा भक्कम स्थूल आर्थिक मूलाधार, भारतात सध्या सुरु असलेल्या  संरचनात्मक सुधारणा, विस्तारत असलेल्या गुंतवणुकीच्या संधी आणि दीर्घकालीन विकासाच्या शक्यता याविषयी आघाडीच्या उद्योग प्रतिनिधींना माहिती देण्याच्या उद्देशाने आयोजित गोलमेज परिषदेत देखील सहभागी होणार आहेत.  
 
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन ,जागतिक आर्थिक आणि सार्वजनिक धोरणाच्या मुद्द्यांवर संवादासाठी युरोपमधील अग्रगण्य वार्षिक मंचांपैकी एक असलेल्या  Les Rencontres Économiques d'Aix-en-Provence, येथे "नवमध्यमवर्गाच्या वाढीस कशी चालना द्यावी" या विषयावरील परिसंवादात सहभागी होणार आहेत. Le Cercle des économistes' या संस्थेद्वारे आयोजित हा मंच जगभरातील राष्ट्रप्रमुख, सरकारप्रमुख, मंत्री, केंद्रीय बँकांचे गव्हर्नर, उद्योगक्षेत्रातील नेते, अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी यांना समकालीन आर्थिक आव्हानांवर विचारमंथन करण्यासाठी एकत्र आणतो.

निर्मला सीतारामन  आपल्या फ्रान्स दौऱ्याचा एक भाग म्हणून  Cadarache येथील 'इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर एक्सपेरिमेंटल रिॲक्टर'  प्रकल्पाला भेट देणार आहेत. हा प्रकल्प अणु संलयन ऊर्जा क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक प्रकल्पांपैकी एक असून भारत आणि फ्रांससह 30 हून अधिक देश या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी आहेत. या भेटीदरम्यान त्या  पॅरिसमधील सायबर सुरक्षेचे प्रमुख केंद्र असलेल्या आणि सायबर सुरक्षा, नवोन्मेष, संशोधन, कौशल्य विकास आणि सरकार, उद्योगजगत आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील सहकार्यासाठी समर्पित असलेल्या  'कॅम्पस सायबर' या फ्रान्सच्या राष्ट्रीय केंद्रालाही भेट देणार आहेत. या भेटीमुळे अनुभवांची देवाणघेवाण होईल तसेच सायबर लवचिकता मजबूत करण्याच्या सर्वोत्तम पद्धती आणि डिजिटल अर्थ्व्यवस्थेतील नवोन्मेषाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

निर्मला सीतारामन या Provence-Alpes-Côte d'Azur (PACA) प्रदेशाचे अध्यक्ष  रेनॉ मुसेलिये यांचीही भेट घेणार असून, गुंतवणूक, नवोन्मेष, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक आर्थिक भागीदारी यांसह परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या संधींवर चर्चा करणार आहेत.

केंद्रीय वित्तमंत्री आपल्या दौऱ्याची सांगता, भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींच्या समुदायातील सदस्यांशी आयोजित संवाद कार्यक्रमात सहभागी होऊन करतील.

 

* * *

शैलेश पाटील/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2280158) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Punjabi , Tamil , Kannada