पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

विजया मेहता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 01 JUL 2026 2:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजया मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.  विजया मेहता या आधुनिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्या होत्या तसेच त्यांच्या सर्जनशीलता आणि कलात्मक उत्कृष्टतेबद्दल असलेल्या निष्ठेसाठी ओळखल्या जात होत्या, असे  मोदी यांनी म्हटले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक पिढ्यांमधील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यप्रेमींना प्रेरणा मिळाली.

पंतप्रधानांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केले

विजया मेहता यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. संस्कृती आणि चित्रपट क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सदैव स्मरणात राहतील.

त्या आधुनिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्या होत्या तसेच सर्जनशीलतेसाठी आणि कलात्मक उत्कृष्टतेप्रती असलेल्या निष्ठेसाठी ओळखल्या जात होत्या. त्यांच्या कार्यामुळे अनेक पिढ्यांमधील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यप्रेमींना प्रेरणा मिळाली.

दुःखाच्या या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे कुटुंबीय, चाहते आणि संपूर्ण कलाविश्वाच्या सोबत आहेत.

ओम शांती.

 

विजया मेहता जी यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सदैव स्मरणात राहतील.

आधुनिक मराठी रंगभूमीच्या त्या प्रणेत्या होत्या, सर्जनशीलता आणि कलात्मक उत्कृष्टता यांच्याप्रती असलेल्या निष्ठेसाठी त्या ओळखल्या जात होत्या. त्यांच्या कार्याने अभिनेते, दिग्दर्शक आणि रंगभूमीप्रेमींच्या अनेक पिढ्यांना प्रेरित केले.

या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती, चाहत्यांप्रती आणि संपूर्ण कलाक्षेत्राप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.

 

* * *

नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2279794) अभ्यागत कक्ष : 79