राज्यसभा सचिवालय
राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना शपथ दिली
प्रविष्टि तिथि:
29 JUN 2026 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जून 2026
राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात मल्लिकार्जुन खर्गे यांना शपथ दिली. कर्नाटक राज्यातून पुन्हा एकदा राज्यसभेवर निवडून आलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी हिंदीमध्ये शपथ घेतली.
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश; राज्यसभेचे सभागृह नेते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायन आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा; संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू; कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल; माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन; राज्यसभेचे सदस्य सोनिया गांधी, जयराम रमेश, मुकुल वासनिक, डॉ. सय्यद नसीर हुसेन; लोकसभेचे सदस्य प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल; राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी आणि सचिवालयाचे इतर वरिष्ठ अधिकारीही याप्रसंगी उपस्थित होते.


* * *
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2279072)
आगंतुक पटल : 7