पंतप्रधान कार्यालय
जागतिक ऊर्जेच्या भविष्यात विकसनशील देशांना केंद्रस्थानी ठेवण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांवर आधारित लेख पंतप्रधानांनी मांडला समोर
Posted On:
27 JUN 2026 1:27PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी लिहिलेला एक लेख समाजमाध्यमावर टाकला आहे. हा लेख एका सुरक्षित, लवचिक, न्याय्य आणि शाश्वत जागतिक ऊर्जेच्या भविष्यामध्ये 'ग्लोबल साऊथ'ला (विकसनशील देशांना) केंद्रस्थानी ठेवण्याच्या भारताच्या भूमिकेवर आधारित आहे. "लवचिक ऊर्जा प्रणाली ही केवळ मजबूत अंतर्गत (देशांतर्गत) धोरणांमुळेच नाही, तर अधिक बळकट आंतरराष्ट्रीय भागीदारीतून निर्माण होते, या भारताला वाटत असलेल्या विश्वासावर त्यांनी या लेखात प्रकाश टाकला आहे," असे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी 'X' या समाज माध्यमावर टिप्पणी केली आहे:
"भारताकडे 2026 मध्ये ब्रिक्सचे समुहाचे अध्यक्षपद येत असताना, केंद्रीय मंत्री श्री @mlkhattar यांनी लिहिले आहे की, भारत एका सुरक्षित, लवचिक, न्याय्य आणि शाश्वत जागतिक ऊर्जेच्या भविष्यात 'ग्लोबल साऊथ'ला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
लवचिक ऊर्जा प्रणाली केवळ मजबूत देशांतर्गत धोरणांनीच नाही, तर अधिक बळकट आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे निर्माण केली जाते, या भारताला वाटत असलेल्या विश्वासावर त्यांनी या,लेखात प्रकाश टाकला आहे."
***
यश राणे/आशुतोष सावे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2278397)
अभ्यागत कक्ष : 46
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam