पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हजरत इमाम हुसेन यांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 26 JUN 2026 12:30PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हजरत इमाम हुसेन (एएस) यांच्या सर्वोच्च त्यागाचे तसेच सत्य व न्यायाप्रति असलेल्या त्यांच्या अतूट वचनबद्धतेचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. इमाम हुसेन यांचे जीवन व त्यांचे बलिदान हे धैर्य आणि दृढ विश्वासाच्या सामर्थ्याची निरंतर आठवण करून देणारे आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी 'एक्स' वर पोस्ट केले:

"हजरत इमाम हुसेन (एएस) यांचे बलिदान अनेकांना सत्य आणि न्यायाच्या मार्गावर ठाम राहण्याची प्रेरणा देत आहे. हे धैर्य आणि दृढ विश्वासाच्या निरंतर शक्तीची आठवण देखील करून देते."

***

शिल्पा पोफळे/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2278141) आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam