उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

“व्हीआयपी कल्चर इन इंडिया पॉवर,प्रिव्हिलेज अँड द डिस्टन्स फ्रॉम डेमोक्रसी” या पुस्तकाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन

प्रविष्टि तिथि: 24 JUN 2026 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जून 2026

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीत उपराष्ट्रपती भवन येथे “व्हीआयपी कल्चर इन इंडिया पॉवर, प्रिव्हिलेज अँड द डिस्टन्स फ्रॉम डेमोक्रसी” या पुस्तकाचे प्रकाशन केले. राज्यसभेचे अरुणाचल प्रदेशमधील माजी सदस्य नबम रेबिया आणि सहलेखक संदीप कुमार यांनी या विषयावर लिहिताना भारतातील लोकशाही शासन आणि सार्वजनिक जीवन याच्या गाभ्याला स्पर्श केला आहे, असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुता यावर आधारित समाजाचे स्वप्न भारताच्या राज्यघटनेने पाहिले आहे. नागरिक आणि सार्वजनिक अधिकार असणाऱ्यांची विश्वासपात्रता यांच्यामधील नात्यांमध्ये लोकशाहीचा आत्मा सामावला आहे,  यावर त्यांनी भर दिला. सार्वजनिक कार्यांकडे लाभापेक्षा जबाबदारी म्हणून बघितले जाते त्याचवेळी  लोकशाही उजळून निघत असते, असेही राधाकृष्णन यांनी नमूद केले. 

“उपलब्धता, करुणा आणि जबाबदारी स्वीकारणे ही खऱ्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये असतात” अशा अर्थाचे तमिळ कवी संत थिरूवलूवर यांचे वचन उपराष्ट्रपतींनी यावेळी उध्दृत केले. जनतेला उपलब्ध असणारे आणि आधार मिळवणारे नेते हे विश्वासाला तसेच कौतुकाला पात्र ठरतात असे प्रतिपादन त्यांनी केले. 

या पुस्तकात स्पष्ट केलेल्या संकल्पना या सार्वजनिक प्रशासन हे लाभाऐवजी सेवेसाठी असते या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेची मेळ घालणाऱ्या आहेत, असे सी.पी.राधाकृष्णन यांनी सांगितले. मान्यवरांसाठीचा लाल दिवा ही पद्धत काढून टाकण्याचा पंतप्रधानांचा निर्णय किंवा नीट परीक्षार्थींना वाहतुकीच्या निर्बंधांचा त्रास होऊ नये म्हणून आपले निर्गमन पुढे ढकलण्याच्या त्यांच्या अलीकडच्या कृतीचा संदर्भ देत राधाकृष्णन म्हणाले की,अशा प्रकारच्या कृती या नागरिक केंद्रित प्रशासनाचे उदाहरण असून सार्वजनिक प्रशासन हे नागरिकांच्या सेवेसाठी असते या तत्वाचा पुरस्कार करणारे आहे. “प्रत्येक भारतीय हा खास असतो आणि प्रत्येक भारतीय हा व्हीआयपी असतो.” या पंतप्रधानांच्या वाक्याची आठवण करून देत “सेवा म्हणजेच सर्वोच्च धर्म आहे”, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

या पुस्तकात माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री तसंच इतर काही व्यक्तिमत्त्वांच्या साधेपणाबद्दल तसेच त्यांच्या लोकसेवेबाबतच्या मूल्यांविषयी या पुस्तकात दिलेल्या संदर्भांची उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली. लेखकांनी त्यांचे विश्लेषण हे भारतातील नागरीकरणाच्या आणि उपनिषदे,रामचरितमानस तसेच पंचतंत्राची आणि  भगवान बुद्धांची शिकवण या बौद्धिक परंपरांच्या संदर्भातून अधिक संपन्नपणे मांडलं आहे, असं उपराष्ट्रपतींनी नमूद केलं ‌. 

संघराज्याच्या व्याख्येत समाविष्ट असणाऱ्या मूल्यांविषयी नव्याने कटिबद्धता राखण्याबाबत आवाहन करत उपराष्ट्रपतींनी कायद्यासमोर समानता, प्रत्येक नागरिकाची प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि करुणापूर्ण तसेच जबाबदारीच्या भावनेतून होणारी सार्वजनिक सेवा यावर भर दिला. कमावलेला विश्वास आणि दिलेली सेवा यावर नेतृत्वाचे खरे मोजमाप होत असते असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री  नबम तुकी, मेघालयचे माजी खासदार डब्ल्यू आर. खार्लुखी, लेखक आणि माजी राज्यसभा सदस्य नबम रेबिया आणि सहलेखक संदीप कुमार आदि मान्यवर  उपस्थित होते.


सुवर्णा बेडेकर/विजया सहजराव/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2277575) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil