संसदीय कामकाज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय विद्यालयांत झालेल्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा 2025-26 च्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 24 JUN 2026 12:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जून 2026

 

केंद्रीय विद्यालयांतील 2025-26 मध्ये झालेल्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धांचा, पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार, 25 जून 2026 रोजी दुपारी 3:00 वाजल्यापासून जीएमसी बालयोगी सभागृह, संसद ग्रंथालय इमारत, संसद भवन संकुल, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे.

कायदा आणि न्याय राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि स्पर्धेत केलेल्या गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांना आणि विद्यालयांना पारितोषिक वितरित करतील. याप्रसंगी, केंद्रीय विद्यालयांत 2025-26 मध्ये आयोजित झालेल्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत, प्रथम क्रमांक मिळवलेल्या “डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालय, प्रेसिडेंट इस्टेट, नवी दिल्ली (दिल्ली विभाग, उत्तर विभाग)” येथील विद्यार्थी, पारितोषिक वितरण समारंभादरम्यान त्यांच्या युवा संसद बैठकीचे पुनश्च सादरीकरण करतील.

संसदीय कामकाज मंत्रालय गेल्या 38 वर्षांपासून केंद्रीय विद्यालयांमध्ये युवा संसद स्पर्धांचे आयोजन करत आहे. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेच्या योजने उपक्रमाअंतर्गत, या मालिकेतील 36व्या स्पर्धा 2025-26 दरम्यान देशभरातील केंद्रीय विद्यालय संघटनेच्या 25 विभागांमधील 200 विद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.

युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता, विचारांची योग्य अभिव्यक्ती असे लोकशाहीला आवश्यक जीवनशैलीचे सद्गुण रुजवणे हा आहे. याशिवाय, ही योजना विद्यार्थ्यांना संसदेची कार्यपद्धती आणि प्रक्रिया, चर्चा व वादविवादाची तंत्रे यांची ओळख करून देण्याचे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, तसेच प्रभावी वक्तृत्वकला आणि कौशल्य विकसित करते.

“या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल “सरदार वल्लभभाई पटेल फिरती संसदीय ढाल” आणि चषक “डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालय, प्रेसिडेंट इस्टेट, नवी दिल्ली (दिल्ली विभाग, उत्तर विभाग)” यांना प्रदान करण्यात येईल. याशिवाय, स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पुढील 4 केंद्रीय विद्यालयांना मंत्र्यांच्या हस्ते विभागीय विजेतेपदाचे चषकही प्रदान केले जातील :-

Sl. No.

Name of Kendriya Vidyalaya

Zone

1.

Kendriya Vidyalaya, Mathura Cantt., Mathura, (Uttar Pradesh REGION)

WEST

2.

PM Shri Kendriya Vidyalaya No. 1, Madurai, Tamil Nadu (CHENNAI REGION)

SOUTH

3.

PM Shri Kendriya Vidyalaya No.2, Shivaji Nagar, Bhopal, Madhya Pradesh (BHOPAL REGION)

CENTRAL

4.

PM Shri Kendriya Vidyalaya, Air Force Station, Borjhar Guwahati, Assam (GUWAHATI REGION)

EAST

 

तसेच, स्पर्धेत प्रादेशिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या पुढे दिलेल्या 20 केंद्रीय विद्यालयांना मंत्र्यांच्या हस्ते प्रादेशिक विजेतेपदाच्या पुरस्कार प्रदान केले जातील.

Sl. No.

Name of Kendriya Vidyalaya

Region

1

Kendriya Vidyalaya No. 2, Akhnoor, Jammu.

JAMMU

2

PM Shri Kendriya Vidyalaya Kapurthala Cantt., Punjab

CHANDIGARH

3

PM Shri Kendriya Vidyalaya, Solan, Himachal Pradesh

GURGAON

4

PM Shri Kendriya Vidyalaya, Pithoragarh, Uttarakhand

DEHRADUN

5

PM Shri Kendriya Vidyalaya, Sabarmati, Gujarat

AHMEDABAD

6

PM Shri Kendriya Vidyalaya No.1, Air Force Station, Suratgarh, Rajasthan

JAIPUR

7

PM SHRI Kendriya Vidyalaya No.1, Air Force Station, Pune, Maharashtra

MUMBAI

8

PM Shri Kendriya Vidyalaya, TATA Nagar, East Singhbhum, Jharkhand

RANCHI

9

PM Shri Kendriya Vidyalaya No. 1, Satna, Madhya Pradesh

JABALPUR

10

PM Shri Kendriya Vidyalaya CRPF, Pallipuram, Thiruvananthapuram, Kerala

ERNAKULAM

11

PM Shri Kendriya Vidyalaya, Nellore, Andhra Pradesh

HYDERABAD

12

PM Shri Kendriya Vidyalaya No. 1, Air Force Station, Sambra, Karnataka

BENGALURU

13

PM Shri Kendriya Vidyalaya No.1, Air Force Station Chakeri, Kanpur, Uttar Pradesh

LUCKNOW

14

PM Shri Kendriya Vidyalaya, Danapur Cantt., Patna, Bihar

PATNA

15

PM Shri Kendriya Vidyalaya No.2, NTPC, Korba, Chhattisgarh

RAIPUR

16

PM Shri Kendriya Vidyalaya, BHU Campus (FS), Varanasi, Uttar Pradesh

VARANASI

17

Kendriya Vidyalaya No.1 Imphal, Manipur

TINSUKIA

18

PM Shri Kendriya Vidyalaya, Ballygunge, Kolkata, West Bengal

KOLKATA

19

Kendriya Vidyalaya ONGC, Srikona, Assam

SILCHAR

20

PM Shri Kendriya Vidyalaya, Bargarh, Bhubaneswar, Odisha

BHUBANESWAR

 

* * *

नितीन फुल्लुके/संपदा पाटगावकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2277374) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu , Kannada