पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रपती भवनातील नागरी अलंकरण सोहळा-II ला पंतप्रधानांची उपस्थिती
Posted On:
23 JUN 2026 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवनात आयोजित नागरी अलंकरण सोहळा-II ला उपस्थित राहिले, ज्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पंतप्रधान म्हणाले की, हे पुरस्कार विविध क्षेत्रांमधील असाधारण सेवा आणि समर्पणाचा गौरव आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, हे पुरस्कारप्राप्त प्रत्येक व्यक्ती समाजाप्रती असलेल्या देशाच्या वचनबद्धतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे.
पंतप्रधान म्हणाले की, पुरस्कारविजेत्यांचा जीवनप्रवास असंख्य नागरिकांना प्रेरणा देतो आणि सर्वांना कठोर परिश्रम व सेवेच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो.
पंतप्रधान मोदी 'एक्स' वरील एका पोस्टमध्ये म्हणाले;
“राष्ट्रपती भवनातील नागरी अलंकरण सोहळा-II मध्ये सहभागी झालो, ज्यामध्ये पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार विविध क्षेत्रांमधील असाधारण सेवा आणि समर्पणाचा गौरव आहे. पुरस्कारप्राप्त प्रत्येक व्यक्ती समाजाप्रती असलेल्या आपल्या राष्ट्राच्या वचनबद्धतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यांचा जीवनप्रवास असंख्य नागरिकांना प्रेरणा देतो आणि सर्वांना कठोर परिश्रम व सेवेच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो.
@PadmaAwards”
* * *
सोनाली काकडे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2277302)
अभ्यागत कक्ष : 47
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam