पंतप्रधान कार्यालय
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसानिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली, संस्कृत सुभाषित केले सामायिक
Posted On:
23 JUN 2026 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2026
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुखर्जी यांना आदरांजली वाहिली आणि राष्ट्र-उभारणीसाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण केले.
पंतप्रधानांनी डॉ.मुखर्जी यांचे वर्णन भारताच्या विकासासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणारे एक महान देशभक्त, विद्वान आणि मुत्सद्दी असे केले. डॉ.मुखर्जी यांची अविचल निष्ठा, सार्वजनिक जीवनातील धैर्य आणि राष्ट्रहिताप्रती असलेली बांधिलकी अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. डॉ.मुखर्जी यांचे बलिदान आपल्या देशाच्या सामुहिक स्मृतीत कोरले गेले आहे असे त्यांनी नमूद केले.
डॉ.मुखर्जी यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान म्हणाले की, डॉ.मुखर्जी यांनी देशाची आणि समाजाची निःस्वार्थी सेवा करण्यासाठी त्यांचे संपूर्ण जीवन समर्पित केले. डॉ.मुखर्जी यांचे थोर विचार आणि आदर्श आपल्या देशातील प्रत्येक पिढीला मातृभूमीची सेवा करण्यासाठी प्रेरणा देत राहतील, असे त्यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी, पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित देखील सामायिक केले:
“न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशुः।
परेण नाकं निहितं गुहायां विभ्राजते यद्यतयो विशन्ति॥”
हे सुभाषित असे सांगते की अमरत्व हे कर्म, संपत्ती अथवा वंश यातून नव्हे तर त्याग आणि उदात्त आदर्शांच्या प्रती संपूर्ण समर्पणातून मिळवता येते.राष्ट्र, समाज आणि सत्यासाठी वैयक्तिक कल्याणाचा विचार बाजूला सारणारे थोर आत्मे काळाच्या मर्यादा ओलांडून लोकांच्या हृदयांमध्ये अमर होऊन राहतात.
पंतप्रधानांनी एक्स मंचावर लिहिले आहे;
“महान देशभक्त, विद्वान आणि मुत्सद्दी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसानिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. त्यांनी आपले जीवन भारताच्या विकासासाठी समर्पित केले होते. त्यांची अविचल निष्ठा, सार्वजनिक जीवनातील धैर्य आणि राष्ट्रहिताप्रती असलेली बांधिलकी अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. त्यांचे बलिदान आपल्या देशाच्या सामुहिक स्मृतीत कायमचे कोरले गेले आहे. त्यांनी जपलेल्या आणि त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत अनुसरलेल्या मूल्यांच्या मार्गदर्शनाखाली बलशाली आणि विकसित भारताची उभारणी करण्याच्या आमच्या कटिबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो.”
“निःस्वार्थ भावनेने देश आणि समाजाच्या सेवेत संपूर्ण आयुष्यभर समर्पित असलेले महान देशभक्त डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिवसानिमित्त आदरांजली. त्यांचे तेजस्वी विचार आणि आदर्श देशातील प्रत्येक पिढीला मातृभूमीची सेवा करण्यासाठी प्रेरित करत राहतील.
न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशुः।
परेण नाकं निहितं गुहायां विभ्राजते यद्यतयो विशन्ति॥”
* * *
सोनाली काकडे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2277127)
अभ्यागत कक्ष : 38
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam