युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
सरकारने राष्ट्रीय क्रीडा मंडळातील अध्यक्ष आणि दोन सदस्यांच्या निवडीसाठी मागवले अर्ज
राष्ट्रीय क्रीडा मंडळ हे राष्ट्रीय क्रीडा संस्थांना मान्यता देणारी आणि प्रशासन, तसेच आर्थिक व नैतिक मानकांचे पालन सुनिश्चित करणारी मध्यवर्ती संस्था म्हणून काम करेल
प्रविष्टि तिथि:
23 JUN 2026 3:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2026
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा मंडळातील अध्यक्ष आणि दोन सदस्यांच्या निवडीसाठी अर्ज मागवले आहेत.
ही निवड राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा 2025 आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशासन (राष्ट्रीय क्रीडा मंडळ) नियम 2026 मधील तरतुदींनुसार केली जाईल.
राष्ट्रीय क्रीडा मंडळातील अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे केली जाईल. ही नियुक्ती शोध-तथा-निवड समितीच्या शिफारशींवर आधारित असेल. ही समिती राष्ट्रीय क्रीडा मंडळ (शोध-तथा-निवड समिती) नियम 2026 च्या नियम 3 (3) अन्वये गठित केली जाईल. सक्षम, प्रामाणिक आणि प्रतिष्ठित, तसेच ज्यांना सार्वजनिक प्रशासन, क्रीडा प्रशासन, क्रीडा कायदा आणि इतर संबंधित क्षेत्रांचे ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव आहे, अशा व्यक्तींमधून अध्यक्ष आणि सदस्यांची निवड केली जाईल.
राष्ट्रीय क्रीडा मंडळाच्या (एनएसबी) अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीचे वेतन आणि इतर अटी व शर्ती 'राष्ट्रीय क्रीडा प्रशासन (राष्ट्रीय क्रीडा मंडळ) नियम 2026 मधील तरतुदींनुसार निश्चित केले जाईल.
राष्ट्रीय क्रीडा मंडळ हे राष्ट्रीय क्रीडा संस्थांना मान्यता देणारी आणि प्रशासन, तसेच आर्थिक व नैतिक मानकांचे पालन सुनिश्चित करणारी मध्यवर्ती संस्था म्हणून काम करेल.
पात्र व्यक्ती https://sports.yas.gov.in/application_app या ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2026 आहे.
* * *
सोनाली काकडे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2276996)
आगंतुक पटल : 16