पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योगदिन सर्वत्र एक जागतिक सोहळा म्हणून साजरा केल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
Posted On:
21 JUN 2026 10:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगदिन 2026 ला एक जागतिक सोहळा म्हणून साजरा केल्याबद्दल जगभरातील लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
योग सर्व स्तरातील, सर्व राष्ट्रांमधील लोकांना, निरामयता आणि निरोगी आरोग्य या समान ध्येयाच्या पूर्ततेसाठी एकत्र आणत आहेत, हे अतिशय प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
हा दिवस आगामी काळात आणखी कित्येक लोकांना, योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक बनवण्यासाठी प्रेरित करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर लिहिले आहे:
“संपूर्ण जगभरासाठी एक अविस्मरणीय योगदिन!
आंतरराष्ट्रीय योगदिन 2026 ला एक जागतिक सोहळा म्हणून साजरा केल्याबद्दल जगभरातील लोकांचे मनापासून आभार.
योग सर्व स्तरातील, सर्व राष्ट्रांमधील लोकांना, निरामयता आणि निरोगी आरोग्य या समान ध्येयाच्या पूर्ततेसाठी एकत्र आणत आहेत, हे अतिशय प्रेरणादायी आहे.
हा दिवस आगामी काळात आणखी लोकांना योगाला आपल्या दिनचर्येचा भाग बनवण्यासाठी प्रेरित करो.
#IDY2026
#YogaForHealthyAgeing”
* * *
नितीन फुल्लुके/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2276450)
अभ्यागत कक्ष : 37
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam