MIFF banner

मिफ्फ 2026 : छायाचित्रांतून – 19 व्या मिफ्फच्या समारोप सोहळ्यात रेड कार्पेटवर मान्यवरांचे आगमन

मुंबई, 21 जून 2026

 

19 वा  मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 अर्थात मिफ्फचा  समारोप सोहळा चित्रपट सृष्टीतील अनेक प्रथितयश मान्यवर आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीने उजळून गेला.

या समारंभाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा आणि  सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम उपस्थित होते. याशिवाय, प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री एमी बरुआ, अभिनेत्री शीना चौहान, डॉ. किरण शांताराम तसेच ख्यातनाम ॲनिमेटर-दिग्दर्शक रायमुंड क्रुमे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

मिफ्फ 2026 मध्ये  आठवडाभर चाललेल्या चित्रपट महोत्सवाच्या भव्य समारोप सोहळ्यातील झगमगाट, आनंदी चेहरे आणि अविस्मरणीय क्षण पुन्हा अनुभवूया.

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (मिफ्फ) समारोप सोहळ्यापूर्वी रेड कार्पेटवर महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महाराष्ट्र सरकारचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य सचिव  किरण कुलकर्णी आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम

 

19 व्या मिफ्फच्या समारोप सोहळ्यापूर्वी रेड कार्पेटवर चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम

 

अभिनेत्री एमी बरुआ यांचे 19 व्या मिफच्या समारोप सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आगमन

 

प्रख्यात चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांचे सुपुत्र डॉ. किरण शांताराम आणि भारताच्या राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाचे तांत्रिक सल्लागार उज्ज्वल निर्गुडकर मिफ्फ 2026 च्या समारोप सोहळ्याच्या रेड कार्पेटवर

 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विश्वास देवस्कर देखील रेड कार्पेटवर

 

याच सोहळ्यात अभिनेत्री शीना चौहान यांनी मिफ्फ 2026 च्या समारोप सोहळ्यात रेड कार्पेटवर आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली

 

दिग्दर्शक आणि ॲनिमेटर, रायमुंड क्रुमे यांनी मिफ्फ 2026 च्या समारोप सोहळ्यात रेड कार्पेटवर हजेरी लावली

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2276368   |   Visitor Counter: 12

इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , English , Urdu , Telugu