जेव्हा तंत्रज्ञानच बनते कथाकार : मिफ्फ चित्रपट महोत्सवातील कृत्रिम बुद्धिमत्ताधारित चित्रपटांनी खुले केले कथात्मक मांडणीचे नवे क्षितिज
यंत्रांच्या पलीकडे जात कल्पकतेचा वेध : मिफ्फ मधील कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत चित्रपटांनी भविष्यातील सिनेमांमधील मानवी स्पर्षाचे घडवले दर्शन
मुंबई, 20 जून 2026
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 (मिफ्फ) मध्ये द एआय फिल्म्स (The AI Films) या विशेष विभागांतर्गत सिनेमॅटिक नवोन्मेषाचा गौरव केला गेला. या विभागाअंतर्गत निवड झालेल्या चित्रपटांमधून कथात्मक मांडणी, तंत्रज्ञान आणि कल्पकतेचा मिलाफ घडवून आणण्याचा धाडसी प्रयत्न दिसला. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI - Artificial Intelligence) हे कशा रितीने नव सर्जनशीलतेचं माध्यम बनले आहे, आणि या तंत्रज्ञानामुळे जगभरातील चित्रपटकर्मींना इतिहास, पौराणिक कथा, वैयक्तिक आठवणी आणि सिनेमाच्या पारंपरिक सीमा चौकट ओलांडणारी क्लिष्ट कथानके सुलभतेने उलगडण्याचे पर्याय उपलब्ध झाले असल्याचेही प्रचितीही या चित्रपटांतून प्रेक्षकांना आली.
ऐतिहासिक संघर्षांच्या कथा सांगायची असो, अनोख्या ॲनिमेशन शैलीचा वापर करणे असो किंवा एखाद्या कलाकाराच्या मनात नेमके काय सुरु असते याचा खोलवर वेध घ्यायचा असो, अशा कोणत्याही बाबतीत कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी सर्जनशीलतेची जागा घेत नसल्याचेच या चित्रपटांमधून दिसून आले. त्याउलट, ज्या कथा पारंपरिक पद्धतीने मांडणे कदाचित कठीण ठरले असते शा कथा सांगण्यासाठी या तंत्रज्ञानामुळे एक प्रभावी माध्यम चित्रपटकर्मींच्या हाती आले असून,.
या निवडक चित्रपटांमधील लिजेंड्स – द इटरनल फ्लेम ऑफ मेवाड (Legends – The Eternal Flame of Mewar) हा दीपक विजय यांनी दिग्दर्शित केलेला उत्कृष्ट चित्रपट अपवादात्मक ठरला. अरवलीच्या टेकड्यांमध्ये एक भाट एकटाच गात फिरत असल्याचे या चित्रपटात आपल्याला दिसते. या दृश्यातूनच सन्मानासाठी लढा देणारे राज्य अशी ओळख असलेल्या, या प्रदेशाचा बाप्पा रावल यांच्यापासून ते महाराणा प्रताप यांच्यापर्यंतच्या ऐतिहासिक कालखंडांचा सलगतेने माग घेण्याचा प्रयत्न आपल्याला या चित्रपटात दिसतो.

याच विभागातला लॉरेंट क्लिक्वेट यांनी दिग्दर्शित केलेला द स्क्रीनरायटर (The Screenwriter) हा चित्रपट एका लेखकाच्या मनातील मानसिक द्वंद्वाचा वेध घेणारा एक लघुपट आहे. एका ठराविक दृष्टिकोनाचा अवलंब केलेल्या या चित्रपटात सर्जनशील प्रक्रियेदरम्यानच्या मानसिक संघर्षाचा माग घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केलेला आहे.

झुआन ली यांचा द स्टार शेफर्ड (The Star Shepherd) हा फेल्ट ॲनिमेशन तंत्रावर आधारित एक संगित व्हिडिओ आहे. युनिसेफने मलावीला दिलेल्या भेटीवरून प्रेरित असलेल्या या व्हिडिओतून, प्रेमाची भावना एकाच आकाशाखाली अनोळखी व्यक्तींना कशा रीतीने परस्परांशी जोडते, याचे सुंदर चित्रण पाहायला मिळते.

अक्षत वर्मा यांचा किष्किंधा : वान कथा (Kishkindha: Van Katha) हा पौराणिक कथांच्या प्रेमींच्या पसंतीस उतरेल असा चित्रपटही या विभागात दाखवला गेला. हा चित्रपट अनेक पुराणांमध्ये मांडलेल्या संशोधनावर आधारित आहे. प्राचीन वानर साम्राज्यातील मोठे संघर्ष, राजकारण आणि शोकात्मिक प्रवास पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने या चित्रपटातून केला आहे.
या विभागातील अपवादात्मक चित्रपटांचा उल्लेख केला तर त्यात ताल्या लोटन यांचा स्टोनवॉल, द मेकिंग ऑफ (Stonewall, The Making of) हा चित्रपट नक्कीच असेल. या चित्रपटात गृहयुद्धातल्या जनरलवरील न बनलेल्या चित्रपटाच्या निर्मितीचा माग घेतो. या चित्रपटाच्या मांडणीत मोठ्या कल्पकतेने मुलाखती आणि पडद्यामागील दृश्यांची अनोखी मोट बांधली गेली आहे, त्यामुळे पडद्यामागील चित्रीकरण आणि चित्रपटात साकारलेला इतिहास यांमधली दरी पूर्णतः मिटली असल्याची अनूभूती येते.
यासोबतच कर्ष झवेरी यांनी दिग्दर्शित केलेल्या द ॲक्ट ऑफ किलिंग ड्रीम्स (The Act of Killing Dreams) हा लघुपटही या विभागाअंतर्गत दाखवला गेला. या लघुपटात एका अद्भूत, चित्रमय नैसर्गिक पार्श्वभूमीच्या माध्यमातून कलात्मक परंपरा आणि तंत्रज्ञानामधील संघर्षाचा वेध घेण्याचा प्रयत्न दिसतो. दिग्गज वास्तवादी शैलीचे दिग्दर्शक उदयोन्मुख कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या कलाकारांना आव्हान देताना दिसतात. यासोबतच जर्मनीच्या मार्क वाचहोल्झ यांनी दिग्दर्शित केलेला द सिनेमा दॅट नेव्हर वॉज (The Cinema That Never Was) या विभागात दाखवला गेला. हा चित्रपट काळाच्या ओघात किंवा नष्ट झाल्यामुळे अस्तित्वात नसलेल्या संहिता, रील्स आणि चित्रपटांच्या इतिहासावर चिंतन करणारा आहे. या हरवलेल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी यात जनरेटिव्ह वर्कफ्लोचा वापर केला गेला आहे. या विभागातील राजेश भाटिया आणि भारत अरोरा यांनी दिग्दर्शित केलेल्या द इको मॉनेस्ट्री (The Echo Monastery) या चित्रपटात एका शोकाकुल लडाखी महिलेचा आठवणींचा सामना करत शांततेचा शोध घेण्याबद्दलचा विस्तीर्ण डोंगराळप्रदेशातील प्रवास आपल्यासमोर मांडतो. समरेश श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेला द लिजेड ऑफ बिरसा मुंडा हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे तयार केलेला चरित्रात्मक ॲनिमेशनपट आहे. यात वसाहतवादी राजवटीविरोधातील ऐतिहासिक उलगुलान इथल्या संघर्षाला उजाळा दिला गेला आहे. त्यातून आदिवासी अभिव्यक्तिच्या संघर्षाला अभिवान केले गेले आहे.
एकत्रितपणे या चित्रपटांनी मिफ्फ महोत्सवासाठी आलेल्या चित्रपट रसिकांना आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मितीच्या भविष्याची एक अद्भुत झलक दाखवून दिली. चित्रपट निर्मिती प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना, त्यातून साधला जाणारा परिणाम कशारितीने मानवी कथांना जिवंतपणाचा स्पर्ष देऊ शकतो ही बात या चित्रपटांतून दिसून आली.
* * *
पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2275648
| Visitor Counter:
21