आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

12व्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या देशव्यापी उत्सवात नागरिकांनी सहभागी होण्याचे आयुष मंत्रालयाचे आवाहन

Posted On: 20 JUN 2026 2:09PM by PIB Mumbai


देशभरात उद्या 21 जून रोजी 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन  2026 ची जय्यत तयारी सुरू असताना, आयुष मंत्रालयाने देशभरातील नागरिकांना या ऐतिहासिक उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य, सौहार्द आणि भारताच्या कालातीत योग परंपरेचा हा एक ऐतिहासिक सोहळा असणार आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 चा मुख्य कार्यक्रम 21 जून रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक 'रेड रोड' येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देश एकत्र येऊन योगाभ्यास करेल आणि भारताचा योगाचा संदेश जगापर्यंत पोहोचवेल, असे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार),  आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करताना जाधव यांनी, या वर्षी सांस्कृतिक मंत्रालय देशातील 100 ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या ठिकाणी योग दिन 2026 च्या कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याचे सांगितले. यामध्ये भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे आणि योगची प्राचीन परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल, असे ते पुढे म्हणाले.
या ऐतिहासिक प्रसंगाचा भाग होण्याचे आणि आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 हा सोहळा संस्मरणीय व यशस्वी करण्यासाठी उत्साहाने योगदान देण्याचे आवाहन जाधव यांनी केले.
या वर्षी, सांस्कृतिक मंत्रालय भारताच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा आणि योग साधना यांमधील अनोखा संबंध अधोरेखित करण्यासाठी देशातील 100 महत्त्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी योग दिन 2026 चे आयोजन करत आहे.
हे उत्सव देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केले जातील, ज्यामध्ये खालील ठिकाणांचा समावेश आहे:
महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, एलिफंटा (घारापुरी), मुंबई, पुणे, जुन्नर आणि नागपूर यांसह इतर शहरे.
आयुष मंत्रालयाने सर्व नागरिक, संस्था, संघटना आणि समुदायांना 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सवात सामील होण्याचे, आपल्या जवळच्या योग केंद्रावर वेळेत पोहोचण्याचे आणि सर्वांनी एकत्र मिळून योगाचा सराव करण्याचे आवाहन केले आहे.

***

सुषमा काणे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2275627) अभ्यागत कक्ष : 77