पंतप्रधान कार्यालय
'विवाटेक 2026' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
प्रविष्टि तिथि:
18 JUN 2026 9:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष ईमॅन्यूएल मॅक्रो, आज पॅरिसमध्ये झालेल्या विवा टेक 2026 मध्ये सहभागी झाले. हा युरोपातील सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप उपक्रम असतो.
यावेळी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वयंउद्योजक, स्टार्ट अप्स, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांशी संवाद साधतांना, पंतप्रधानांनी, मानव-केंद्री एआय आणि आघाडीच्या तंत्रज्ञांनाविषयीचा भारताचा दृष्टिकोन अधोरेखित केला, तसेच, उदयोन्मुख तंत्रज्ञानात, भारत-फ्रांस सहकार्याच्या विस्तारत असलेल्या क्षितिजावरही ते बोलले. तंत्रज्ञानामुळे, भारतात आमूलाग्र परिवर्तन घडू लागले आहे, असे त्यांनी नमूद केले, यात, एआय सक्षम कृषी प्रगती पासून ते अत्याधुनिक अवकाश अॅप्लिकेशन्स यांचा त्यांनी उल्लेख केलं.
पंतप्रधानांच्या बीजभाषणानंतर, मोदी आणि मॅक्रो यांनी, भारतीय स्टार्ट अप्स आणि नवोन्मेषक यांच्याशी संवाद साधला. त्यांनी या कार्यक्रमात, उद्योगजगत, आरोग्य व्यवस्था, शाश्वत विकास आणि गतिशीलता अशा क्षेत्रातील आघाडीचे तंत्रज्ञान आणि समस्यांवरील व्यावहारिक उपाययोजना सादर केल्या आहेत.
विवा टेक 2026 मध्ये, भारत एआय भागीदार आहे. विवा टेक मधले भारताचे आजवरचे हे सर्वात मोठे सादरीकरण आणि उपस्थिती असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल सार्वजनिक सुविधा, आरोग्य-तंत्रज्ञान, स्वच्छ तंत्रज्ञान, गतिशीलता, अॅडव्हान्स कॉम्प्युटिंग अशा सर्व क्षेत्रातील त्यांच्या नवोन्मेष व्यवस्था त्यांनी या प्रदर्शनात मांडल्या आहेत. 80 पेक्षा अधिक डीप-टेक कंपन्या आणि स्टार्ट अप्स या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत.
विवा टेक मध्ये पंतप्रधानांच्या सहभागामुळे, भारत आणि फ्रांस यांच्यातील तंत्रज्ञान व्यवस्थांमधील भागीदारी अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षात, भारताचा विवा टेक मधील सहभाग उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे.
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली विवाटेक मध्ये बीजभाषण केले होते.
· वर्ष 2022 मध्ये, भारत, विवा टेक मधला, पहिला ‘कंट्री ऑफ द इयर’ होता; आणि
· ‘विवाटेक’ने अलीकडेच, बंगरुळू तंत्रज्ञान शिखर परिषदेमध्ये, आपले अधिकृत सहकार्य स्थापन केले आहे.
2026 हे वर्ष, भारत- फ्रांस यांच्यातील नवोन्मेष वर्ष म्हणून साजरे केले जात असतांना,विवा टेक मधला भारताचा सहभाग विशेष महत्वाचा ठरला आहे.
सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2274935)
आगंतुक पटल : 41
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam