संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर येथील यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये 10,000 टन क्षमतेच्या ॲल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसचे संरक्षणमंत्री करणार भूमिपूजन

प्रविष्टि तिथि: 18 JUN 2026 2:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 जून 2026

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 19 जून 20026 रोजी महाराष्ट्रातील नागपूरातील अंबाझरीमधील यंत्र इंडिया लिमिटेड (YIL),या आयुध कारखान्यातील अत्याधुनिक 10,000 टन ॲल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसचे भूमिपूजन करणार आहेत. या समारंभाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार आणि संरक्षण उत्पादन विभागाचे तसेच वायआयएलचे (YIL) इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

प्रस्तावित एक्सट्रूजन प्रेस हा संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी एक महत्वपूर्ण  राष्ट्रीय मालमत्ता ठरेल. यामुळे संरक्षण आणि अंतराळ  क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात, उच्च-शक्तीचे आणि अचूक ॲल्युमिनियम मिश्रधातूंचे एक्सट्रूजन तयार करण्याची देशाची क्षमता बळकट होईल. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे ॲल्युमिनियम एक्सट्रूडेड घटकांच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळेल.

 

* * *

नाना मेश्राम/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2274535) आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu