वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि युनायटेड किंगडमकडून नेक्स्ट जनरेशन आर्थिक कॉरिडॉर खुला : सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार आणि सामाजिक सुरक्षा योगदानासंबंधीचा करार 15 जुलै 2026 पासून अमलात येणार

प्रविष्टि तिथि: 17 JUN 2026 10:00PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 जून 2026

भारत आणि युनायटेड किंगडम (UK) दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार (CETA - Comprehensive Economic and Trade Agreement) 15 जुलै 2026 पासून अमलात येणार असल्याची घोषणा दोन्ही देशांनी केली आहे. ही घोषणा भारताच्या जागतिक आर्थिक सहभागाच्या दृष्टीने महत्वाची घडामोड ठरली आहे.  हा निर्णय देशाच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक मुत्सद्देगिरीतील महत्वाचा टप्पा ठरला आहे. यासोबतच, डबल काँट्रिब्युशन कन्व्हेन्शन (DCC) हा दोन्ही देशांमधील सामाजिक सुरक्षा करार देखील 15 जुलै 2026 पासून अंमलात येणार आहे. यामुळे भारतीय व्यावसायिक तज्ञांना युनायटेड किंगडममध्ये ये जा करणे सुलभ होईल तसेच, त्यांची व्यावसायिक स्पर्धात्मकता अधिक भक्कम होईल. यासोबतच, डबल काँट्रिब्युशन कन्व्हेन्शन (DCC) या सामाजिक सुरक्षा कराराअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सवलतीची मुदतही आता 3 वर्षांवरून वाढवून 5 वर्षे केली गेली आहे. यामुळे भारताच्या कंत्राटी किंवा तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कामगारांना मोठा लाभ होणार आहे.

दोन्ही देशांच्या सरकारांच्या अंतर्गत प्रक्रिया आणि मंजुरी विषयक प्रक्रिया (रॅटिफिकेशन्स) यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर, हे करार अधिकृतपणे 15 जुलै 2026 पासून लागू होतील. हा ऐतिहासिक टप्पा विकसित भारत 2047 या राष्ट्रीय संकल्पाशी संलग्न असून, यामुळे एका अत्यंत प्रगत आणि समतोल असलेल्या स्वरुपाची आर्थिक व्यवस्था प्रत्यक्षात उभी राहणार आहे. हे करार अमलात आल्याने धोरणात्मक निर्णयांचे रूपांतर एका मोठ्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबतच्या दैनंदिन सक्रिय व्यापारात होणार आहे.

भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार आणि डबल काँट्रिब्युशन कन्व्हेन्शन (DCC) या सामाजिक सुरक्षा करारा या दोन्ही करारांची 15 जुलै 2026 पासून होणारी अंमलबजावणी, हा भारताच्या जागतिक पटलावरील एकात्मिक, लवचिक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्था बनण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या निर्णयातून परस्परांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी तसेच दोन्ही देशांतील नागरिकांच्या समृद्धीसाठी भारत आणि युनायटेड किंगडम यांच्या परस्पर सामायिक वचनबद्धतेची प्रचिती येते.


शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2274341) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Kannada