पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आदर आणि प्रशंसा यांचं महत्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 17 JUN 2026 11:44AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, स्नेहपूर्ण आदर आणि मान्यता मिळाल्यामुळे व्यक्तीला स्वत:चा अभिमान वाटतो आणि समाधान मिळते. यामुळे केवळ आत्मविश्वासचं वाढतो असं नाही, तर व्यक्तीमध्ये नवी ऊर्जा आणि उत्साहही संचारतो.

पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले.

“त्वत्सम्भावितमात्मानं बहु मन्यामहे वयम्‌ ।

प्रायः प्रत्ययमाधत्ते स्वगुणेषूत्तमादरः।। ”

कोणत्याही व्यक्तीकडून आदराने स्वीकारले जाणे ही अत्यंत अभिमानाची आणि धन्यतेची भावना आहे, कारण हे अगदी सत्य आहे की थोर पुरुषांनी दिलेला आदर माणसाच्या मनात त्याच्या स्वतःच्या गुणांविषयीचा आत्मविश्वास प्रकर्षाने जागृत करतो, हाच संदेश या सुभाषितातून मिळतो.

पंतप्रधानांनी एक्स या समजमाध्यामावरील संदेशांत म्हंटल आहे :

"स्नेहपूर्ण आदर आणि मान्यता मिळाल्यामुळे व्यक्तीला स्वतःचा अभिमान वाटतो आणि समाधान मिळते. यामुळे केवळ आत्मविश्वासचं वाढतो असं नाही, तर व्यक्तीमध्ये नवी उर्जा आणि उत्साहही संचारतो."

“त्वत्सम्भावितमात्मानं बहु मन्यामहे वयम्‌ ।

प्रायः प्रत्ययमाधत्ते स्वगुणेषूत्तमादरः।। ”

 

* * *

नाना मेश्राम/सविता म्‍हस्कर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2273860) अभ्यागत कक्ष : 39