संरक्षण मंत्रालय
युवकांचा प्रवेश वाढवण्यासाठी आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्ये स्वतंत्र राज्य संचालनालयांची स्थापना करायला एनसीसीची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
15 JUN 2026 1:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2026
युवकांना सक्षम बनवण्याच्या आणि राष्ट्रीय छात्र सेनेमधील (एनसीसी) त्यांचा प्रवेश वाढवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, एनसीसी मुख्यालय महासंचालनालयाने आंध्र प्रदेश आणि झारखंड येथे स्वतंत्र राज्य संचालनालयांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. यामुळे भारतातील एनसीसी राज्य संचालनालयांची एकूण संख्या 17 वरून 19 वर गेली आहे.
आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्ये स्वतंत्र राज्य संचालनालये स्थापन केल्यामुळे, एनसीसी आपल्या सेवेच्या कक्षेत येणाऱ्या कॅडेट्स आणि शैक्षणिक संस्थांच्या अधिक जवळ येईल. नवीन प्रशासकीय रचनेमुळे अधिक उद्दिष्ट केंद्रित समन्वय, सुधारित पर्यवेक्षण आणि प्रशिक्षण आणि विकासात्मक उपक्रमांसाठी अधिक सहाय्य, या गोष्टी शक्य होतील. तसेच, सुधारित प्रशिक्षण पायाभूत सुविधा आणि सहाय्यक यंत्रणांच्या माध्यमातून या राज्यांमधील तरुणांसाठी अधिक संधी उपलब्ध होतील.
हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, भारतातील युवा वर्गाला सक्षम बनवण्याच्या संकल्पनेला अनुसरून असून, यामुळे देशातील तरुण आत्मविश्वासपूर्ण, सक्षम आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिक बनतील आणि ते देशाच्या प्रगतीत अर्थपूर्ण योगदान द्यायला सज्ज होतील.
1948 मध्ये 20,000 कॅडेट्स (छात्रसैनिक) सह स्थापन झालेली एनसीसी, आज 20 लाखांहून अधिक कॅडेट्स असलेली जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना बनली आहे. 2014 ते 2025 दरम्यान या संस्थेत 6 लाख कॅडेट्सची भर पडली असून, सध्या देशभरातील 750 हून अधिक जिल्ह्यांमध्ये ही संस्था कार्यरत आहे. नव्या प्रशासकीय सामर्थ्यासह, ही संस्था जबाबदार नागरिकांना घडवण्याचे आणि अधिक सक्षम, 'विकसित भारत' उभारण्याच्या कामात योगदान देत आहे.
* * *
आशिष सांगळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272906)
आगंतुक पटल : 34