पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
प्रोजेक्ट जीआयबीमध्ये आणखी तीन पिल्लांची भर, बंदिस्त संवर्धनातील पक्ष्यांची संख्या 94 झाली: केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव
बंदिस्त संवर्धनाच्या चौथ्या वर्षात आतापर्यंत 26 पिल्लांचा जन्म
Posted On:
14 JUN 2026 7:39PM by PIB Mumbai
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी रविवारी सांगितले की, 'प्रोजेक्ट ग्रेट इंडियन बस्टर्ड' (जीआयबी) अंतर्गत बंदिस्त संवर्धन प्रजनन कार्यक्रमात गेल्या काही दिवसांत आणखी तीन पिल्लांची भर पडली आहे. यामुळे बंदिस्त संवर्धनाच्या चौथ्या वर्षात आतापर्यंत जन्माला आलेल्या पिल्लांची एकूण संख्या 26 झाली आहे.
'एक्स' या समाज माध्यमावर ही माहिती देताना यादव म्हणाले की, नव्याने जन्माला आलेल्या तीन पिल्लांपैकी एक पिल्लू जंगलातून संकलित केलेल्या अंड्यातून तर दोन पिले बंदिस्त संवर्धन केंद्रात घातलेल्या अंड्यातून जन्माला आली आहेत. आता बंदिस्त पक्ष्यांची संख्या 94 झाली असून, या हंगामात आणखी पिल्ले जन्माला येण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.
जीआयबीच्या बंदिस्त संवर्धनाच्या चौथ्या वर्षात आतापर्यंत 36 पिल्ले जन्माला आली आहेत. यापैकी कृत्रिम रेतनाद्वारे 18, नैसर्गिक प्रजननाद्वारे 4 आणि जंगलातून गोळा केलेल्या अंड्यांमधून जन्मलेल्या 4 पिल्लांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली
जंगलातून संकलित केलेल्या अंड्यांच्या बदल्यात राजस्थानमध्ये ‘जंपस्टार्ट’ उपयोजनाद्वारे जंगलात 3 पिल्लांचा जन्म झाला आहे. या उपक्रमामुळे मूळ जनुकीय विविधता वाढवण्यास आणि भक्षकांपासून होणारा धोका कमी करण्यात मदत होत आहे असेही यादव यांनी सांगितले.




***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2272749)
अभ्यागत कक्ष : 68