संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा - एनडीएमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या महिलांची पहिली तुकडी संरक्षण दलात दाखल

प्रविष्टि तिथि: 13 JUN 2026 9:28PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये (एनडीए) प्रशिक्षण घेतलेल्या महिलांच्या पहिल्या तुकडीतील छात्रा संरक्षण दलात अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या आहेत. ही घटना लष्करी सेवेतील महिलांच्या सहभागाचा एक उल्लेखनीय टप्पा आहे. ऑगस्ट 2022 मध्ये एनडीएच्या 148 व्या तुकडीमध्ये प्रवेश घेतलेल्या 17 महिला छात्रांनी आपापल्या सेवादलाच्या अधिकारी होण्यासाठीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

13 जून 2026 रोजी देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून 158 व्या नियमित तुकडीच्या दीक्षांत संचलनादरम्यान नऊ महिला अधिकारी लष्कराच्या सेवेत रुजू झाल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली.

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2272392&reg=48&lang=1

13 जून 2026 रोजी हैदराबादमधील डुंडीगल येथील वायू दल प्रशिक्षण केंद्राच्या 217 व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलन कार्यक्रमात पाच महिला छात्रा भारतीय वायू दलात अधिकारी म्हणून दाखल झाल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली.

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2272390&reg=48&lang=1

भारतीय नौदलाच्या एझिमला येथील भारतीय नौदल प्रशिक्षण अकादमीच्या 28 मे 2026 रोजी झालेल्या दीक्षांत संचलनात तीन महिला छात्रा नौदलात अधिकारी म्हणून दाखल झाल्या. या दीक्षांत संचलनाची मानवंदना दक्षिण नौदल मुख्यालयाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, व्हाइस ऍडमिरल समीर सक्सेना यांनी स्वीकारली.

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2266384&reg=48&lang=1

संरक्षण दलांच्या सेवेत  रुजू होऊन या महिला अधिकारी देशसेवेची जबाबदारी घेतलेल्या विश्वासू लष्करी अधिकाऱ्यांच्या ताफ्यात सामील झाल्या आहेत. त्यांचे संरक्षण दलांमध्ये दाखल होणे बदलत्या संरक्षण क्षेत्रातील निर्णायक टप्पा आहे. लष्करी सेवेतील समान संधी, गुणवत्ता व सर्वोत्कृष्टता याविषयीची देशाची वचनबद्धता यातून प्रतिबिंबित होते. या महिलांचे यश त्यांची समर्पित वृत्ती, शिस्त व चिकाटी यांचा परिणाम आहे आणि त्यांच्या या यशामधून राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची व सैन्यदलांमध्ये करिअर करण्याची प्रेरणा देशभरातील मुलींना मिळत राहील.  

***

माधुरी पांगे्/सुरेखा जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2272604) आगंतुक पटल : 60
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil , Telugu , Malayalam