पंतप्रधान कार्यालय
जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
12 JUN 2026 3:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2026
जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय क्रीडा जगताचे मोठे नुकसान झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
मोदी यांनी म्हटले आहे की, नेमबाजीतील आपल्या असाधारण कामगिरीने त्यांनी देशाला मोठा गौरव मिळवून दिला. पंतप्रधानांनी नमूद केले की, एक मार्गदर्शक म्हणून युवा खेळाडूंना घडवण्यात त्यांनी अत्यंत निष्ठेने दिलेले योगदानही तेवढेच उल्लेखनीय आहे. उत्कृष्टता, शिस्त आणि क्रीडा विश्वाची सेवा, याप्रति असलेल्या अतूट वचनबद्धतेमुळे त्यांनी मोठी प्रशंसा मिळवली.
राणा यांचे कुटुंबीय,मित्र आणि संपूर्ण क्रीडा विश्वाच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे:
“जसपाल राणा यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय क्रीडा विश्वाची मोठी हानी झाली आहे. नेमबाजीतील आपल्या असामान्य कामगिरीने त्यांनी देशाचा गौरव वाढवला. एक मार्गदर्शक म्हणून युवा खेळाडूंना घडवण्यात त्यांनी अत्यंत निष्ठेने दिलेले योगदानही तेवढेच उल्लेखनीय आहे. उत्कृष्टता, शिस्त आणि क्रीडा क्षेत्रातील सेवा याबाबतच्या त्यांच्या अटळ निष्ठेमुळे त्यांनी मोठी प्रशंसा मिळवली.
राणा यांचे कुटुंबीय, मित्र आणि संपूर्ण क्रीडा विश्वाच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.”
नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
(Release ID: 2272113)
अभ्यागत कक्ष : 60
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam