अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मायक्रोफायनान्स संस्था-2.0 साठी पत हमी योजनेला सरकारची मुदतवाढ, कर्जाच्या मर्यादेतही केली वाढ

प्रविष्टि तिथि: 10 JUN 2026 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जून 2026

 

केंद्रसरकारने  'मायक्रोफायनान्स’ म्हणजेच सूक्ष्‍म वित्तीय  संस्थांसाठी असलेल्या (सीजीएसएमएफआय -2.0) पत हमी योजना-2.0 च्या वैधतेला मुदत वाढ दिली आहे. यानुसार 31.8.2026 पर्यंत किंवा 20,000 कोटी रुपयांच्या रकमेसाठी हमी जारी होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल त्या तारखेपर्यंत मुदतवाढ देण्‍यास मंजुरी दिली आहे. सरकारने व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या (एयूएम) च्या एकूण 20% इतक्या मर्यादेपर्यन्त मोठ्या आकाराच्या एनबीएफसी-एमएफआय/एमएफआय साठी कर्ज रकमेची कमाल मर्यादा 300 कोटी रुपायांवरून  1000 कोटी पर्यन्त वाढवण्‍यासही  मंजुरी दिली आहे.

प्रभाव:

मोठ्या आकाराच्या एनबीएफसी-एमएफआय/एमएफआय साठी लागू असलेल्या कर्जाच्या कमाल मर्यादेत वाढ आणि वैधतेचा कालावधी वाढवल्यामुळे, या योजनेचा अधिक चांगल्या प्रकारे वापर होईल आणि एमएफआय क्षेत्राला होणारा कर्जपुरवठा वाढायला सहाय्य होईल, अशी अपेक्षा आहे.

पार्श्वभूमी:

केंद्र सरकारने 20 मार्च 2026 रोजी सीजीएसएमएफआय -2.0 योजना सुरू केली. नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड (एनसीजीटीसी) द्वारे बँका/वित्तीय संस्थांना बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी-मायक्रोफायनान्स संस्था (एनबीएफसी-एमएफआय) आणि एमएफआयना, लहान कर्जदारांना कर्ज देण्यासाठी त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आर्थिक सहाय्यावरील अपेक्षित नुकसनीसाठी हमी संरक्षण प्रदान करणे, हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत एकूण 770 कोटी रुपयांची कर्जे मंजूर करण्यात आली आहेत.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये:

  • पात्र कर्जदार: आरबीआयने वेळोवेळी विहित केलेल्या सूक्ष्म वित्तपुरवठ्याच्या नियामक व्याख्येनुसार, सध्याचे अथवा नवीन लघु कर्जदार.
  • हमी संरक्षण: लहान एमएफआय / एमएफआयसाठी थकबाकीच्या एकूण रकमेच्या 80%, मध्यमसाठी 75% आणि  मोठ्यांसाठी 70%.
  • हमी शुल्क: मंजूर रकमेवर (पहिल्या वर्षासाठी) आणि थकीत रकमेवर (त्यानंतरच्या कालावधीसाठी) वार्षिक 0.50%.
  • व्याजदर: एम.एल.आय. द्वारे एनबीएफसी-एमएफआय किंवा एमएफआय ना दिल्या जाणाऱ्या कर्जांसाठी व्याजदर ईबीएलआर किंवा एमसीएलआर + 2% प्रति वर्ष इतका मर्यादित असेल. लघु कर्जदारांना पुढे कर्ज देताना, या एमएफआय / एनबीएफसी-एमएफआय ने व्याजदर हा मागील 6 महिन्यांतील सरासरी कर्जदरापेक्षा 1% कमी या मर्यादेत राहील.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2271331) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil