कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी भारतात डिजिटल समावेशकता आणि भविष्यासाठी सज्ज कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पाच नवीन सोलर कम्युनिटी हब स्किल व्हॅनना दाखवला हिरवा झेंडा


डेल टेक्नॉलॉजीज आणि एनएसडीसीने भारतात डिजिटल समावेशकता आणि भविष्यासाठी सज्ज कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पाच नवीन सोलर कम्युनिटी हब स्किल व्हॅन सुरू केल्या

प्रविष्टि तिथि: 09 JUN 2026 4:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जून 2026

कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी आज पाच नवीन सोलर कम्युनिटी हब स्किल व्हॅनना हिरवा झेंडा दाखवला. संपूर्ण भारतात डिजिटल सुविधांचा विस्तार आणि भविष्यासाठी सज्ज कौशल्य विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.  डेल टेक्नॉलॉजीज (NYSE: DELL) ने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) च्या सहकार्याने विकसित केलेला आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनद्वारे राबविण्यात आलेला हा उपक्रम, डिजिटल दरी सांधण्याच्या डेलच्या सर्वात महत्त्वाकांक्षी जागतिक प्रयत्नांपैकी एका प्रयत्नाचा पुढील टप्पा आहे. या कौशल्य व्हॅन्स उत्तर प्रदेश, दिल्ली/एनसीआर, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमधील समुदायांना सेवा पुरवतील आणि सौरऊर्जेवर चालणारे तंत्रज्ञान, एआय-आधारित शिक्षण व रोजगाराचे मार्ग थेट युवक , महिला आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचवतील.

हा विस्तार मूलभूत डिजिटल साक्षरतेपुरता सीमित नाही . या कौशल्य व्हॅन्स गरजेनुसार कौशल्य विकास मॉड्यूल आणि सुव्यवस्थित रोजगारक्षमता मार्ग सादर करतात, तसेच 50 हून अधिक व्यावसायिक, उच्च शिक्षण आणि सामुदायिक संस्थांना तंत्रज्ञान-आधारित  सहाय्य पुरवतात. प्रत्येक व्हॅन नवीकरणीय  ऊर्जेवर चालते आणि लॅपटॉप, इंटरॅक्टिव्ह स्क्रीन, इंटरनेट कनेक्टिव्हिटी व एआय-आधारित शैक्षणिक साधनांनी सुसज्ज असून  पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार नव्हे, तर समुदाय जिथे आहेत तिथेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास तयार केली आहेत.
जयंत चौधरी म्हणाले, “सोलर कम्युनिटी हब स्किल व्हॅन्स हे भारताच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञान आणि संधी सहज उपलब्ध करून देण्याच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहेत. या स्किल व्हॅन्स केवळ डिजिटल जागा नाहीत, तर त्या आकांक्षांची केंद्रे आहेत, जी तरुणांना उदयोन्मुख संधींसाठी तयार करण्याच्या दृष्टीने स्वच्छ ऊर्जा, एआय-आधारित शिक्षण आणि उद्योगाशी संलग्न कौशल्य यांचा मेळ घालतात.”

“डेल टेक्नॉलॉजीज भारताच्या सर्वसमावेशक, तंत्रज्ञान-आधारित विकासाच्या दृष्टिकोनाप्रति  वचनबद्ध आहे,” असे डेल टेक्नॉलॉजीज इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनीष गुप्ता म्हणाले. “जेव्हा सरकार, उद्योग आणि समुदाय एका सामायिक ध्येयासाठी एकत्र येतात, तेव्हा काय शक्य होते याचा  सोलर कम्युनिटी हब स्किल व्हॅन्स या दाखला आहेत.  या स्किल व्हॅन्स शिकणाऱ्या आणि कामगारांच्या नवीन पिढीला त्यांच्याच समुदायात भविष्यातील  नोकऱ्यांसाठी तयार करतील.”

या स्किल व्हॅन्सच्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण उदयोन्मुख बाजारपेठेच्या मागण्यांशी सुसंगत आहे, जे सहभागींना विद्यमान भूमिकांसाठीच नव्हे, तर भविष्यात निर्माण होणाऱ्या भूमिकांसाठीही सुसज्ज बनवते.

 

 

निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2270763) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Tamil