युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी 18 वर्षांखालील हॉकी आशिया चषक स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला संघांचा केला सत्कार

Posted On: 08 JUN 2026 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जून 2026

केंद्रीय युवा कार्य आणि  क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी सोमवारी  भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांचा जपानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील त्यांच्या शानदार कामगिरीबद्दल सत्कार केला.

कर्णधार केतन कुशवाहाच्या नेतृत्वाखालील18 वर्षांखालील भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी काकामिगाहारा येथे झालेल्या अंतिम सामन्यात यजमान जपानला  4-1 ने पराभूत करून 18 वर्षांखालील आशिया कप 2026 चे विजेतेपद पटकावले.

केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी पुरुष संघाला 61.5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

तर दुसरीकडे, कर्णधार स्वीटी कुजूरच्या नेतृत्वाखालील 18 वर्षांखालील भारतीय महिला हॉकी संघाने कांस्यपदकासाठी झालेल्या  सामन्यात कोरियावर 3-0  असा दणदणीत विजय नोंदवून 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.

डॉ. मांडवीय यांनी महिला संघाला प्रोत्साहन म्हणून 21 लाख रुपयांचा धनादेश दिला.

डॉ. मांडवीय यांनी पुरुष आणि महिला संघाशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहन दिले. देशाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केलेल्या अथक परिश्रमाबद्धल मी दोन्ही संघांचे अभिनंदन करतो.  संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही तर केवळ सुरुवात आहे. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. तुमच्या क्षमतांचा सर्वोत्कृष्ट वापर करत तुमचे पालक आणि हितचिंतकांना आनंदी करा, तेच तुमचे ध्येय असले पाहिजे, असे ते म्हणाले.


निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के /प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2270497) अभ्यागत कक्ष : 74