पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फिलीपिन्समधील मिंडानाओ येथे भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि विध्वंसाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले

Posted On: 08 JUN 2026 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलीपिन्समधील मिंडानाओ येथे भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि विध्वंसाबद्दल दुःख व्यक्त केले. पंतप्रधानांनी शोकाकुल कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो  अशी प्रार्थना केली.

फिलीपिन्सचे नागरिक आणि सरकार यांच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा आहे,असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

"फिलीपिन्समधील मिंडानाओ येथे आज भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि विध्वंसाने व्यथित झालो.शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो  अशी प्रार्थना.फिलीपिन्सचे नागरिक आणि सरकार यांच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा आहे.

@bongbongmarcos”


सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2270439) अभ्यागत कक्ष : 81