पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ अभिनेते सलीम कुमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
07 JUN 2026 1:52PM by PIB Mumbai
ज्येष्ठ अभिनेते सलीम कुमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र दुःख व्यक्त केले. सलीम कुमार यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत वैविध्यपूर्ण भूमिका आणि संस्मरणीय अभिनयाच्या जोरावर एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली होती, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या कठीण प्रसंगी सलीम कुमार यांचे कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हणले आहे.
'X' वरील पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात,
"ज्येष्ठ अभिनेते सलीम कुमार यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. संस्मरणीय अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपली एक वेगळी छाप सोडली. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबाच्या आणि असंख्य चाहत्यांच्या पाठीशी आहेत. ॐ शांती."
***
नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2270123)
अभ्यागत कक्ष : 54
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam