विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात आकांक्षी भारताची जडणघडण : डॉ जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
07 JUN 2026 5:01PM by PIB Mumbai
मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत सुसंधी, नवोन्मेश, आत्मविश्वासयुक्त आकांक्षी भारताची जडणघडण झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यानी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केले. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासनिक सुधारणा, तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण आणि नागरिककेंद्री धोरणे यामुळे नागरिकांची आपल्या भविष्याविषयीची धारणा बदलली आहे यावर त्यांनी बोलताना भर दिला. यावेळी बोलताना त्यांनी विकासाची पुढील रुपरेषा विशद करताना देश 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या उद्देशाने वाटचाल करत असताना भारताचा सध्याचा सुमारे 9 अब्ज डॉलर्सच्या आसपास असलेला अंतराळ कार्यक्रम येत्या 7 ते 8 वर्षामध्ये 45 अब्ज डॉलर्सपर्यंत विस्तारेल असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलगपणे 4,399 कार्यकालीन दिवसांसंदर्भात बोलताना गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या महत्वाच्या बदलांची व्याप्ती डॉ जितेंद्र सिंह यांनी नमूद केली.
देशातील स्टार्टअप परिसंस्था 2014 मधील सुमारे 350 ते 400 स्टार्टअप्सवरून सध्या 2.3 लाखांहून अधिक संख्येच्या स्टार्टअप्सपर्यंत विस्तारली आहे, ज्यामुळे सुमारे 24 ते 25 लाख रोजगार निर्माण झाले आहेत. यापैकी जवळपास निम्मे स्टार्टअप्स द्वितीय आणि तृतीय स्तराच्या शहरांमध्ये आहेत, तर 35-39 टक्के महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, असेही ते म्हणाले .
सरकारने केलेल्या सुरुवातीच्या काही सुधारणा या सरकारी नागरीक-केंद्री प्रशासन मॉडेल दर्शवणाऱ्या होत्या असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. कागदपत्रांचे सत्यापन राजपत्रित अधिकाऱ्याकडून करण्याऐवजी स्व-सत्यापित कागदपत्रे स्वीकारण्याचा निर्णय ही नागरिकांवर विशेषतः तरुणांवर विश्वास दर्शवणारी एक पायरी होती असे त्यांनी नमूद केले,
सरकारी भरतीमध्ये अनेक श्रेणींतील मुलाखती पद्धत रद्द करण्याचा संदर्भ सिंह यांनी दिला. या निर्णयामुळे घराणेशाही, मनमानी आणि भ्रष्टाचार करण्याच्या संधी कमी होऊन गुणवत्तेवर आधारित निवड व्यवस्था भक्कम होऊ लागली. प्रभाव किंवा शिफारसींवर भरवसा ठेवण्याऐवजी क्षमता आणि कठोर परिश्रमांतून यश मिळू शकते असा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी या सुधारणांमुळे मदत झाली, असे त्यांनी सांगितले.

***
निलीमा चितळे/विजया सहजराव/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2270107)
आगंतुक पटल : 12