पंतप्रधान कार्यालय
भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या प्रवासातील उल्लेखनीय गतीवर पंतप्रधानांनी टाकला प्रकाश
5 गिगावॉट डेटा सेंटर क्षमता विकसित करण्यासाठी एअरट्रंक कंपनीच्या सुमारे 3 लाख कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
05 JUN 2026 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2026
भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या प्रवासाने आता उल्लेखनीय गती घेतली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. एअरट्रंक कंपनीने, भारतात सुमारे 3 लाख कोटी रुपये (30 अब्ज डॉलर्स) गुंतवणूक करण्याची आणि 5 गिगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर विकसित करण्याची योजना जाहीर केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ही देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधा व्यवस्थेमधील सर्वात मोठ्या प्रस्तावित गुंतवणुकींपैकी एक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अशा गुंतवणुकीमुळे क्लाउड कंप्युटिंग आणि एआयसाठी जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान लक्षणीयरीत्या मजबूत होईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. या घडामोडींमुळे एकाच वेळी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, स्थानिक पुरवठा साखळ्यांना आधार मिळेल आणि नवोन्मेष-आधारित विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी अधोरेखित केले. तसेच जगाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे भविष्य अधिकाधिक भारतातच घडवले जात आहे, यावर त्यांनी भर दिला.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या प्रवासाने उल्लेखनीय गती घेतली आहे.
एअरट्रंक कंपनीने भारतात सुमारे 3 लाख कोटी रुपये ($30 अब्ज) गुंतवणूक करण्याची आणि 5 गिगावॉट क्षमतेचे डेटा सेंटर विकसित करण्याची योजना जाहीर केली आहे. देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधा व्यवस्थेमधील ही सर्वात मोठ्या प्रस्तावित गुंतवणुकींपैकी एक आहे.”
अशा गुंतवणुकींमुळे क्लाउड कंप्युटिंग आणि एआयसाठी जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक मजबूत होईल, त्याचबरोबर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, स्थानिक पुरवठा साखळ्यांना आधार मिळेल आणि नवोन्मेष-आधारित विकासाला गती मिळेल.
जगाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे भविष्य अधिकाधिक भारतातच घडवले जात आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे !”
* * *
राधिका अघोर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2269446)
आगंतुक पटल : 13