कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ई-शासन राष्ट्रीय पुरस्कार 2026 साठी 7 पुरस्कार श्रेणींमध्ये 17 प्रकल्प/उपक्रमांची निवड

प्रविष्टि तिथि: 04 JUN 2026 4:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जून 2026

 

ई-शासन उपक्रमांच्या अंमलबजावणीत होत असलेले उत्कृष्ट कार्य हुडकून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 'ई-सुशासन राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान केले जातात. 7 श्रेणींमध्ये विभागलेल्या 29 व्या ई सुशासन राष्ट्रीय पुरस्कार 2026 च्या विजेत्यांमध्ये 'ग्रामपंचायत' श्रेणीचाही समावेश आहे. ग्रामपंचायत डिजिटायझेशनच्या माध्यमातून तळागाळात सेवा वितरणाच्या बळकटीकरणाची आणि विस्ताराची दखल घेते.

2. ई-सुशासन राष्ट्रीय पुरस्कार 2026 च्या 10 सुवर्ण आणि 6 रौप्य पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

अ.क्र. प्रकल्पाचे नाव संस्थेचे नाव
1 ॲग्री स्टॅक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
2 ई-जागृती ग्राहक व्यवहार मंत्रालय
3 महाकुंभ 2025 प्रयागराज मेळा प्राधिकरण, प्रयागराज, उत्तर प्रदेश
4 जलद, सुरक्षित आणि ऐच्छिक रक्तदान वाढवण्यासाठी ब्लड बॅग ट्रेसेबिलिटी आणि नागरिक संपर्क पोर्टल केरळ डेव्हलपमेंट अँड ईनोव्हेशन स्ट्रॅटेजिक कौन्सिल (K-DISC)
5 ई-संजीवनी टेलिमेडिसिन सेवेमध्ये एआय-सक्षम  वैद्यकीय निर्णय आधार व्यवस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
6 जिल्हा न्यायालय प्रकरण व्यवस्थापन यंत्रणा (DCMS) केरळ उच्च न्यायालय
7 इतर असंसर्गजन्य आजारांसह मानसिक आणि मादक पदार्थांच्या वापराच्या विकारांची तपासणी आणि व्यवस्थापन एकत्रीकरणावर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा बहुराज्य अंमलबजावणी संशोधन अभ्यास (ICMR-MINDS) भारतीय वैद्याकीय संशोधन परिषद (ICMR)
8 थ्रेट इंटेल डिस्ट्रिब्युशन आणि डीएनएस फिल्टरिंग सेवेसाठी सुरक्षा उत्पादन स्पेस ॲप्लिकेशन केंद्र-ईस्रो, अहमदाबाद
9 सायबर सुरक्षायुक्त ई-नगरपालिका नगर विकास आणि गृहनिर्माण विभाग, मध्य प्रदेश
10 लवचिक डिजिटल बँकिंग परिसंस्थेसाठी एकात्मिक सायबर सुरक्षा चौकट बँक ऑफ बडोदा
11 ई-आरोग्य धमनी – ई-शासनाच्या माध्यमातून आरोग्य सेवेतले परिवर्तन आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार, महाराष्ट्र
12 पुणे 360 पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र
13 कडेपूर ग्रामपंचायत सांगली जिल्हा, महाराष्ट्र
14 विजय नगर ग्रामपंचायत पश्चिम त्रिपुरा जिल्हा, त्रिपुरा
15 त्रिनेत्र (TRINETRA) – महाकालेश्वर मंदिरासह महाकाल रुद्रसागर एकात्मिक विकास प्रदेश (MRIDA) साठी एआय आधारित व्हिडिओ पाळत प्रणाली महाकालेश्वर मंदिर ट्रस्ट, सम्राट विक्रमादित्य प्रशासकीय संकुल भवन, उज्जैन
16 पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स - विकसित भारतासाठी डेटा-चालवणारे सुशासन पंचायती राज मंत्रालय

 

3. ई शासन राष्ट्रीय पुरस्कार 2026 चा परीक्षक  पुरस्कार खालीलप्रमाणे आहे:

अ.क्र. प्रकल्पाचे नाव संस्थेचे नाव
1 सीओआरएस नेटवर्कद्वारे वास्तविक वेळ अचूक स्थान निश्चिती सेवा भारतीय सर्वेक्षण विभाग 

 

5. ई-शासन राष्ट्रीय पुरस्कार 2026 चे स्वरूप: (i) सन्मानचिन्ह, (ii) प्रमाणपत्र आणि (iii) सुवर्ण पुरस्कार विजेत्यांसाठी 10 लाख रुपये आणि रौप्य पुरस्कार विजेत्यांसाठी  5 लाख  रुपयांचे प्रोत्साहनपर पुरस्कार यांचा समावेश आहे. हे पुरस्कार संबंधित केंद्रीय मंत्रालय/विभाग/राज्य/केंद्रशासित प्रदेश/जिल्हा/संस्था/ग्रामपंचायत यांना प्रकल्प/कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी किंवा सार्वजनिक कल्याणाच्या कोणत्याही क्षेत्रातली संसाधनांची तफावत दूर करण्यासाठी दिले जातात. 

6. पुरस्कार सोहळा:

राजस्थानमधल्या जयपूर इथे आयोजित करण्यात येणाऱ्या ई-शासनसंबंधी 29 व्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.

 

* * *

सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2268908) आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Bengali , Bengali-TR , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu