ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिजिटल प्लॅटफॉर्म वर डार्क पॅटर्न्सचा वापर करणाऱ्या खाजगी शिकवणी केंद्रांविरोधात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची मोठी कारवाई


ग्राहकांच्या माहितीआधारीत निवडीवर प्रभाव टाकणार्‍या पद्धतींबद्दल फिजिक्सवाला कंपनीला 5 लाख रुपये तर मॅकॅफी कंपनीला 1 लाख रुपयांचा दंड

ग्राहकांच्या माहिती आधारीत संमतीला बाधा आणणाऱ्या पद्धती त्वरित बंद करण्याचे दोन्ही कंपन्यांना आदेश

प्रविष्टि तिथि: 03 JUN 2026 4:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2026

मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA - Central Consumer Protection Authority) फिजिक्सवाला लिमिटेड आणि मॅकॅफी सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी शिकवणी केंद्र चालवणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. डिजिटल मंचांवर ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आणि ग्राहकांनी काय निवडावे यासंबंधीच्या निर्णयावर दिशाभूल करणारा प्रभाव पाडणाऱ्या डार्क पॅटर्न्स पद्धतींचा वापर केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.

या कारवाईअंतर्गत फिजिक्सवाला कंपनीला 5 लाख रुपयांचा, तर मॅकॅफी कंपनीला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दोन्ही कंपन्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवरून त्वरित अशा चुकीच्या पद्धती हटवाव्यात असे आदेशही दिले गेले आहेत. यासोबच ग्राहकांना कोणत्याही दबावाशिवाय किंवा फेरफाराशिवाय स्वतःच्या इच्छेने माहितीवर आधारित निर्णय घेता येतील, याची सुनिश्चिती करण्याचे निर्देशही प्राधिकरणाने दिले आहेत

ही संपूर्ण कारवाई ग्राहक संरक्षण कायदा 2019, ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) नियम 2020 आणि डार्क पॅटर्न्स प्रतिबंध आणि नियमन मार्गदर्शक तत्त्वे 2023 अंतर्गत करण्यात आली आहे.

फिजिक्सवाला लिमिटेड - देणगीचा पर्याय आधीच निवडलेला असणे आणि दिशाभूल करणारे मोफत अभ्यासक्रम

S.No.

Provision

Nature of Violation

  1.  

Section 2(9), Consumer Protection Act, 2019

Violation of consumer rights-impairment of free and informed decision-making

  1.  

Section 2(28), Consumer Protection Act, 2019

Misleading advertisement- 'free courses' without disclosing mandatory registration conditions

  1.  

Section 2(47), Consumer Protection Act, 2019

Unfair trade practice- basket sneaking, confirm shaming, forced action

  1.  

Consumer Protection (E-Commerce) Rules, 2020

Rule 4(9): Automatic recording of consent through pre-ticked checkbox; Rule 4(3): Unfair trade practice

  1.  

Dark Patterns Guidelines, 2023

Basket Sneaking, Confirm Shaming, Forced Action

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने फिजिक्सवालाच्या व्यासपीठारील काही पद्धतींची स्वतःहून दखल घेतली होती. त्यात त्यांना या प्लॅटफॉर्मवरील काही विशिष्ट डिझाईनमुळे ग्राहकांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होत होता आणि त्यांना स्वतंत्र तसेच माहितीवर आधारित निवड करण्यापासून रोखले जात होते असे आढळले.

आढळलेले डार्क पॅटर्न्स:

बास्केट स्नीकिंग - ग्राहक जेव्हा पैसे भरण्यासाठी चेकआऊट करतो, तेव्हा त्याच्या बिलामध्ये देणगीची रक्कम परस्पर आणि आपोआप जोडली जात होती.

कन्फर्म शेमिंग - ग्राहकाने बीलासोबत जोडलेली देणगीची रक्कम काढून टाकू नये, म्हणून त्याला भावनिक साद घालत, नकार देण्यापासून परावृत्त करणारे संदेश दाखवले जात होते.

फोर्स्ड  ॲक्शन - मोफत म्हणून जाहिरात केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यापूर्वी, वापरकर्त्यांना त्यांची वैयक्तिक माहिती सामायिक करणे सक्तीचे केले जात होते.

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची निरीक्षणे - 

· ग्राहकाची संमती ही आधीच चिन्हांकित केलेल्या किंवा निवडलेल्या पर्यायांद्वारे गृहीत धरता येत नाही. त्या ऊलट त्यांची संमती ही नेहमी स्पष्टता असलेल्या आणि ग्राहकाच्या सहमती असलेल्या कृतींच्या माध्यमातूनच घेतली गेली पाहिजे.

· अनिवार्य नोंदणी आणि वैयक्तिक माहिती सामायिक करण्याच्या अटींची स्पष्ट माहिती न देता, अभ्यासक्रम मोफत असल्याचे दाखवणे ही ग्राहकांची स्पष्ट स्वरुपात केलेली दिशाभूल आहे.

· या पद्धती अनुचित व्यापारी प्रथांअंतर्गत येतात आणि यामुळे ग्राहकांच्या माहितीच्या आधारे निर्णय घेण्याच्या क्षमतेत बाधा निर्माण होते.

· या प्लॅटफॉर्मचा वापर करणारे बहुतांश वापरकर्ते हे विद्यार्थी आणि अल्पवयीन वयोगटातील आहेत, त्यामुळे अशा पद्धती ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर चिंतेची बाब आहे.
 

S.No.

Provision

Nature of Violation

  1.  

Section 2(28), Consumer Protection Act, 2019

Misleading advertisement: fear-based representation regarding necessity and consequences of non-renewal

  1.  

Section 2(47), Consumer Protection Act, 2019

Unfair trade practice: deceptive and manipulative interface design promoting subscription renewals

  1.  

Consumer Protection (E-Commerce) Rules, 2020

Rule 4(3): Unfair trade practice & Rule 4(9): Impaired explicit and affirmative consumer consent

  1.  

Dark Patterns Guidelines, 2023

Confirm Shaming, Interface Interference, Trick Question, Forced Action

 

आढळलेले डार्क पॅटर्न्स :

भावनिक बळजबरी - ग्राहकाने सबस्क्रिप्शनचे नूतनीकरण केले नाही, तर तो कसा बेजबाबदार आहे अशी जाणीव करून देणारी भावनिक करणारी भाषा वापरणे.

जाहीरात दृश्यमानता - नूतनीकरणाच्या पर्यायाला स्क्रीनवर दृश्यमानतेच्या दृष्टीने जास्त ठळक आणि प्रामुख्याने दिसेल अशा उठावदार स्वरुपात दरशवणे.

संभ्रमात पाडणारे प्रश्न- तटस्थ पर्यायाऐवजी संभ्रम निर्माण करणारी आणि भावनिकतेने भारलेली भाषा वापरणे.

अचूक माहितीचा अभाव– प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडण्यासाठी कोणताही स्पष्ट आणि तटस्थ पर्याय उपलब्ध करून न देणे.

या संदर्भातील अंतिम आदेश खाली दिलेल्या दुव्यावर पाहता येतील: https://jagograhakjago.gov.in/CCPA_Orders/index.html


राधिका अघोर/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2268422) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati