गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष रवी लामीछाने यांच्या नेतृत्वाखालील नेपाळी शिष्टमंडळासोबत घेतली बैठक
निवडणुकीत आरएसपी च्या झालेल्या विजयाबद्दल, गृहमंत्र्यांनी लामीछाने यांचे केले अभिनंदन, नव्या सरकारच्या यशस्वी कार्यकाळासाठी भारतातर्फे दिल्या शुभेच्छा
भारत आणि नेपाळ यांच्यातील विशेष बंध अधिक मजबूत करण्यासाठी एकत्रित काम करण्याचा संकल्प दोन्ही बाजूंनी केला व्यक्त
Posted On:
02 JUN 2026 9:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2026
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री, अमित शाह यांनी आज राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष, रवी लामीछाने यांच्या नेतृत्वाखाली भारतात आलेल्या नेपाळी शिष्टमंडळासोबत नवी दिल्लीत बैठक घेतली.
गृहमंत्री कार्यालयाने, एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे, “गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत, राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष, रवी लामीछाने यांच्या नेतृत्वाखाली भारतात आलेल्या नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. यावेळी गृहमंत्र्यांनी, निवडणुकीतील आरएसपीच्या विजयाबद्दल, लामीछाने यांचे अभिनंदन केले आणि नव्या सरकारच्या यशस्वी कार्यकाळासाठी भारतातर्फे शुभेच्छा दिल्या. भारत आणि नेपाळ यांच्यातील विशेष बंध अधिक मजबूत करण्यासाठी एकत्रित काम करण्याचा संकल्प दोन्ही बाजूंनी यावेळी व्यक्त केला.”
* * *
निलिमा चितळे/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2268184)
अभ्यागत कक्ष : 6