पंतप्रधान कार्यालय
गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक मदतीची घोषणा
प्रविष्टि तिथि:
02 JUN 2026 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2026
गुजरात मधील सुरत जिल्ह्यात झालेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना केली. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून प्रशासन अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत पुरवत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी या अपघातातील मृताच्या वारसाला 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी' (पीएमएनआरएफ) मधून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
'X' वरील पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात,
"गुजरातच्या सुरत जिल्ह्यात झालेल्या अपघाताची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या होवोत हीच प्रार्थना. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रशासन सर्व संबधितांना सर्वतोपरी मदत करत आहे.
प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल, तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील: PM"
* * *
निलिमा चितळे/सविता म्हस्कर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2268155)
आगंतुक पटल : 80
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam