कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरात येत्या 1 जून ते 30 जून या कालावधीत "शेत वाचवा मोहीम" राबवली जाणार


प्रत्येक गावात 'शेत वाचवा मोहीम' पोहोचवण्याची तयारी सुरू असून, पंचायत ते राज्य या पातळीवर व्यापक समन्वयावर यात भर देण्यात आला आहे: शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन

कमी खत, योग्य खत, योग्य सल्ला: संतुलित खतांचा वापर हा 'शेत वाचवा मोहिमे'चा केंद्रबिंदू असेल - केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान

शेतकऱ्यांना हवामान, माती आणि बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार थेट सल्ला मिळेल; 'शेत वाचवा मोहीम' एक मार्गदर्शक शक्ती म्हणून काम करेल - शिवराज सिंह चौहान

तालुकास्तरावर, कृषी विज्ञान केंद्रे (KVKs), आयसीएआर (ICAR) आणि राज्य सरकार मिळून संयुक्तपणे 'शेती वाचवा मोहीम' राबवतील, ज्यामुळे विविध योजनांचे लाभही पोहोचतील याची खात्री केली जाईल - शिवराज सिंह

मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींना सहभागी होण्याचे आवाहन जेणेकरून 'शेती वाचवा मोहिमे'चे राष्ट्रीय जनआंदोलनात रूपांतर होईल

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीत या मोहिमेच्या तयारीसंदर्भात घेतली एक उच्चस्तरीय बैठक

Posted On: 30 MAY 2026 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मे 2026

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेती वाचवा हा केवळ एक जनजागृती कार्यक्रम न ठेवता, ही मोहीम शेती, शेतकरी आणि गावे यांना जोडणारी एक व्यापक राष्ट्रीय मोहीम बनवावी असा संदेश दिला आहे. संतुलित आणि विवेकाने खतांचा वापर करणे, हवामानातील आव्हाने लक्षात घेऊन शेतकऱ्यांना वेळेवर सल्ला देणे, तालुका स्तरावर सक्रिय सहभाग आणि योजनांचे लाभ थेट गावांपर्यंत पोहोचवणे यावर मोहिमेचे लक्ष केंद्रित असले पाहिजे,असे या मोहिमेच्या तयारीच्या अनुषंगाने, शिवराज सिंह यांनी आज दिल्लीत घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितले.

1 जूनपासून सुरू होणारी व महिनाभर चालणारी ही 'शेत वाचवा मोहीम' प्रभावी आणि परिणामकारक ठरावी, शेतजमिनीचे संवर्धन, किफायतशीरपणा आणि शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, केवळ ही मोहीम वरच्या स्तरावरून खाली झिरपणाऱ्या दृष्टिकोनातून नव्हे, तर तालुका ते राज्य आणि केंद्र स्तरापर्यंतच्या सामायिक भागीदारीच्या प्रारुपावर चालवली जाईल.

रासायनिक खतांचा वापर, विशेषतः असंतुलन कमी करणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असेल,यावर बैठकीत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भर दिला. मृदा परीक्षणानुसार खते आणि इतर कृषी सामुग्रीचा संतुलित आणि सुयोग्य प्रमाणात वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना शिक्षित करणे, जैविक खते, सेंद्रिय आणि जैविक उत्पादनांचा वापर वाढवणे, तसेच एकात्मिक पोषण व्यवस्थापनावरील (INM) प्रात्यक्षिके आयोजित करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

आगामी काळात हवामानात होणाऱ्या बदलांमुळे येणाऱ्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये, कोणती पिके घ्यावीत, कशाप्रकारे पीक विविधता अवलंबावी आणि पाण्याची कमतरता किंवा धोक्याच्या परिस्थितीत कोणते पर्याय सर्वोत्तम ठरतील, यावर व्यावहारिक सल्ला दिला जाईल, असे कृषी मंत्री चौहान यांनी नमूद केले. या मोहिमेचा उद्देश केवळ संदेश पोहोचवणे हा नसून, शेतकऱ्यांना शेत पातळीवर परिस्थितीनुसार विशिष्ट सल्ला देणे हा देखील असेल.

ही मोहीम पंचायत स्तरावर अधिक बळकट केली जाईल,असही या बैठकीत सांगण्यात आले. जिथे शक्य असेल तिथे यांत्रिकीकरणासाठी आवश्यक यंत्रांचे वितरण, योजनांमधून मिळणारे लाभ तसेच जिथे शक्य असेल तिथे शासकीय कार्यक्रमांमधून मिळणारऱ्या थेट लाभांची माहिती याचाही या मोहिमेत समाविष्ट केला जावा,असे निर्देशही शिवराज सिंह यांनी यावेळी दिले. 

ही मोहीम केवळ विभागीय अधिकारक्षेत्रांपुरती मर्यादित राहणार नाही, असेही चौहान यांनी असेही सांगितले. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करून मंत्री, खासदार, आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींचा सहभाग मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील, जेणेकरून ही मोहीम केवळ एक प्रशासकीय कार्यक्रम न राहता, जनसहभागाचे एक सशक्त प्रारूप बनेल, असे ही त्यांनी सांगितले. या दृष्टिकोनामुळे मोहिमेच्या सुरुवातीपासूनच त्यात राजकीय, सामाजिक आणि स्थानिक ऊर्जा संचारेल,असे त्यांनी स्पष्ट केले.

या मोहिमेसाठी कृषी विज्ञान केंद्रांना (KVKs)सर्व सहभागी संस्थांच्या प्रमुख समन्वयकाची भूमिका देण्यात आली असून, 1600 हून अधिक पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. खताचा वापर मोठ्या प्रमाणावर करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी, कृषी विज्ञान केंद्रे, आयसीएआर (ICAR) संस्था, एआयसीआरपी (AICRP) केंद्रे येथील शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी यांचा समावेश असलेली 500 पथके तयार करण्यात आली आहेत, तर आयसीएआर संस्था आणि कृषी विज्ञान केंद्रांमधील 1,150 हून अधिक विविध विषयक पथके देखील समांतरपणे कामकरतील.

ही मोहीम केवळ खत व्यवस्थापनापुरती मर्यादित राहणार नाही, तर विविध योजनांचे लाभ शेतांपर्यंत पोहोचतील याचीही खात्री करेल, असे शिवराज सिंह म्हणाले. की, किसान क्रेडिट कार्ड, पीएम-किसान योजनेतून वगळलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा जोडून घेणे, कडधान्ये आणि तेलबिया अभियान, पाम तेल व कापूस अभियान, संतुलित पोषण, जमिनीचे आरोग्य, जलसंधारण आणि विशिष्ट प्रदेशानुरुप कृषी सल्ला यांसारख्या उपक्रमांसाठीचा समन्वित दृष्टिकोन या मोहिमेला बहुउद्देशीय आणि अधिक प्रभावी बनवेल.

संदेश व्यावहारिक असावा, प्रत्यक्ष आचरणात आणता येण्याजोगा आणि स्थानिक पायाभूत सुविधांशी जोडलेला असावा,ही या मोहिमेच्या यशाची गुरुकिल्ली असेल,असे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांनी बैठकीत सांगितले. खतांचा कमी आणि संतुलित वापर, हंगामी शेती सल्ला, तालुकास्तरावरील सहभाग, यंत्रसामग्रीचा समावेश आणि योजनांचे लाभ, तसेच लोकप्रतिनिधींचा सहभाग,अशा म्हणजे. मूलभूत मुद्द्यांवर या मोहिमेदरम्यान, लक्ष केंद्रित केले पाहिजे: शेतजमीन वाचवणे, खर्चाचे व्यवस्थापन करणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि गावपातळीवर कृषी व्यवस्थापनाची नवी संस्कृती विकसित करणे:ही या मोहिमेची दिशा स्पष्ट आहे. 

 

* * *

यश राणे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2267116) अभ्यागत कक्ष : 16