आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी तंबाखूमुक्त शिक्षण संस्थांसाठीच्या प्रायोगिक अॅपचे केले उद्घाटन
Posted On:
29 MAY 2026 4:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मे 2026
जागतिक तंबाखू विरोधी दिन 2026 निमित आज नवी दिल्लीत कर्तव्य भवन इथे झालेल्या कार्यक्रमात, केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यासलीला श्रीवास्तव यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अभियानाअंतर्गत, तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था, टीओएफईआय (ToFEI ) या विशेष प्रायोगिक अॅप चे उद्घाटन केले. तंबाखूच्या सेवनामुळे देशाच्या आजच्या आणि उद्याच्याही पिढीच्या आरोग्यावर, समाजजीवन, अर्थकारण आणि पर्यावरणावर होणारे भयंकर दुष्परिणाम रोखण्यासाठीची भारताची कटिबद्धता याद्वारे दिसून येत आहे. टीओएफई आय हा एक डिजिटल उपक्रम असून, त्याद्वारे शाळा आणि महाविद्यालय परीसरात, तंबाखूमुक्त विषयक नियमावलीची अंमलबजावणी अधिक मजबूत करणे आणि त्यावर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.

या अॅप ची संरचना, खालील सुविधा देण्यासाठी करण्यात आली आहे:
* शिक्षण संस्थांद्वारे स्वयं मूल्यांकन आणि त्याची माहिती देणे.
* टीओएफईआय मार्गदर्शक सूचनेनुसार विभागाचे अनुपालन सुरू आहे का, त्यावर देखरेख ठेवणे.
* तंबाखू नियंत्रण विषयक फलक किंवा सूचना लावणे आणि अंमलबजावणी करणे.
* शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी; विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी जनजागृती व संवेदनशीलता निर्माण करणारे उपक्रम;
आणि
· तंबाखूमुक्त परिसराच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीची अधिक प्रभावी अंमलबजावणी.
ही डिजिटल प्रणाली राज्ये/केंद्रशासित प्रदेश, शैक्षणिक संस्था आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांना प्रमाणित निरीक्षण, अहवाल सादरीकरण आणि अनुपालन मूल्यांकन यंत्रणांद्वारे सहाय्य करेल. यामुळे जबाबदारीची जाणीव वाढण्यास, तसेच मुले आणि किशोरवयीनांसाठी अधिक निरोगी व तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळेल.

महाराष्ट्रासह राजस्थान आणि मेघालय या तीन राज्यांमध्ये या अॅप च्या प्रायोगिक अंमलबजावणीमुळे कार्यान्वयनाची व्यवहार्यता तपासण्यास, अंमलबजावणी व अहवाल प्रणाली अधिक मजबूत करण्यास आणि भविष्यात देशभर या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल.
यावेळी, मंत्रालयाने तंबाखूजन्य पदार्थांच्या नमुना संकलनासाठीची मानक कार्यपद्धती देखील जारी केली. याचा उद्देश तंबाखूजन्य पदार्थांशी संबंधित देखरेख, नियामक अनुपालन आणि गुणवत्ता हमी अधिक बळकट करणे हा आहे.
या कार्यपद्धतीमध्ये, तंबाखूजन्य पदार्थांच्या नमुन्यांचे संकलन, हाताळणी, साठवण, वाहतूक आणि दस्तऐवजीकरण याचे निश्चित नियम दिले आहेत , ज्यामुळे चाचणी प्रक्रिया सुसंगत आणि विश्वासार्ह होईल.

यावर्षीच्या जागतिक तंबाखूमुक्त दिनाची संकल्पना — " आकर्षणामागचा खरा चेहरा उघड - निकोटिन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना " अशी असल्याचे सांगत पुण्यसलीला श्रीवास्तव म्हणाल्या की, तरुण पिढी आणि भावी पिढ्यांना तंबाखू तसेच निकोटीनच्या व्यसनाच्या घातक परिणामांपासून संरक्षण देण्याच्या दृष्टीने ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे.
देशभरातली जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, दंत महाविद्यालये, आयुष संस्था, एनसीडी क्लिनिक्स आणि इतर आरोग्य सुविधांमध्ये दोन हजारहून अधिक तंबाखू व्यसनमुक्ती केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

तंबाखू सेवनामुळे कर्करोग, हृदयविकार, स्ट्रोक, दीर्घकालीन श्वसनविकार तसेच इतर अनेक असंसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, हे आजार देशातील मृत्यू आणि अपंगत्वाच्या मोठ्या प्रमाणासाठी जबाबदार आहेत, असेही श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले.
"तंबाखू विरोधी प्रतिज्ञा बघण्यासाठी QR कोड

एस ओ पी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा."
https://ntcp.mohfw.gov.in/assets/document/Guideline-manuals/Sample%20Collection%20and%20Management%20Draft%209.pdf
निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2266662)
अभ्यागत कक्ष : 25