संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, देशातील जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि पुरवठा साखळीच्या लवचिकतेचा संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील अनौपचारिक मंत्री गटाने घेतला आढावा


पुरवठ्याबाबतची सद्यस्थिती सामान्य, नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाची खरेदी करणे टाळावे - संरक्षण मंत्री

जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न

Posted On: 27 MAY 2026 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मे 2026

पश्चिम आशियातील संघर्षामुळे सतत बदलत असलेल्या परिस्थितीचा आढावा आणि या पार्श्वभूमीवर भारताच्या सज्जतेचा तसेच उपाययोजनांचा अंदाज घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील अनौपचारिक मंत्री गटाची सहावी बैठक आज 27 मे 2026 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य भवन-2 येथे पार पडली.

या बैठकीदरम्यान अनौपचारिक मंत्री गटाने देशभरातील जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि पुरवठा साखळीच्या लवचिकतेचा आढावा घेतला. या संदर्भात संरक्षण मंत्र्यांनी X या समाजमाध्यमावर संदेश सामायिक करून माहिती दिली. आजमितीला देशभरातील पुरवठ्याची सद्यस्थिती आज पूर्णपणे सामान्य आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशावेळी नागरिकांनी घाबरून जाऊन ताणात येत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची खरेदी करणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या बैठकीदरम्यान राजनाथ सिंह यांनी अधिकाऱ्यांना सततच्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाची सज्जता वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहण्याचे निर्देश दिले.  

शेतकऱ्यांना खते आणि इतर महत्त्वाच्या कृषी निविष्ठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील, तसेच देशातील अन्नधान्याचे भाव सातत्याने स्थिर राहतील याची सुनिश्चिती करण्यावर,त्यांनी भर दिला.

या बैठकीदरम्यान देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा पुरवठा असल्याची माहिती मंत्री गटाला देण्यात आली.

यासोबतच देशातील खतांच्या एकंदर साठ्याबद्दची स्थितीही समाधानकारक असल्याबद्दलही या मंत्री समूहाला कळवण्यात आले.

पश्चिम आशियात सध्याचे संकट निर्माण झाल्यानंतर, खतांच्या एकंदर उपलब्धतेमध्ये आयात आणि देशांतर्गत उत्पादनाच्या माध्यमातून एकूण अंदाजे 122.4 लाख मेट्रिक टन इतक्या खताची भर घातली गेल्याबद्दलही मंत्री समुहाला कळवण्यात आले.

खतांच्या पुरेशा उपलब्धतेची सुनिश्चित करण्यासाठी आतापर्यंत अधिकारप्राप्त सचिव समूहाच्या 10 बैठका पार पडल्या आहेत.

उद्योग क्षेत्राने विशेषतः सूक्ष्म, लघु  आणि मध्यम उद्योग क्षेत्राने, केंद्र सरकारच्या आपत्कालीन कर्ज हमी योजना 5.0 बद्दल कृतज्ञता व्यक्त केली असल्याबाबतही या अनौपचारिक मंत्री समूहाला सांगण्यात आले. या योजनेमुळे सूक्ष्म, लघु  आणि मध्यम उद्योगांना खेळत्या भांडवलाचा ताण कमी करण्यात मोठी मदत होत असल्याची माहिती मंत्री गटाला देण्यात आली.


निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2266081) अभ्यागत कक्ष : 8
Read this releasein: English , Urdu , Tamil , Kannada