पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 26 MAY 2026 8:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मे 2026

जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान मोदी यांनी हिंद-प्रशांत आणि त्यापलीकडील प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीला चालना देण्यासाठी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.

या प्रदेशाच्या आणि जगाच्या सामायिक हितासाठी भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या महत्त्वावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

पंतप्रधानांनी x वरच्या पोस्टमध्ये म्हटले;

“जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी यांचे स्वागत करताना आनंद झाला. हिंद-प्रशांत आणि त्यापलीकडच्या क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीला चालना देण्यासाठी भारत-जपान विशेष धोरणात्मक  आणि जागतिक भागीदारीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.”

@moteging”


निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2265643) अभ्यागत कक्ष : 20