पंतप्रधान कार्यालय
चीनमधील खाण दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले
प्रविष्टि तिथि:
23 MAY 2026 8:28PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनच्या शांक्सी प्रांतातील खाण दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.
भारताच्या जनतेच्या वतीने, पंतप्रधानांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि चीनच्या जनतेप्रति मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या. या दुःखद प्रसंगी मृतांच्या कुटुंबियांना धैर्य लाभो, तसेच अद्याप बेपत्ता असलेल्या सर्व व्यक्तींची लवकरात लवकर आणि सुरक्षित सुटका होवो, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
"चीनच्या शांक्सी प्रांतातील खाण दुर्घटनेतील जीवितहानीमुळे व्यथित झालो आहे. भारताच्या जनतेच्या वतीने, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि चीनच्या जनतेप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो. या दुःखद प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांना धैर्य लाभो. अद्याप बेपत्ता असलेल्या सर्व व्यक्तींची लवकरात लवकर आणि सुरक्षित सुटका होवो, अशी प्रार्थना करतो.”
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2264677)
आगंतुक पटल : 53
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam