दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“भारतात सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कचा प्रसार” यावरील सल्लामसलत पत्रावर अभिप्राय आणि सूचना स्वीकारण्याला मुदतवाढ

प्रविष्टि तिथि: 22 MAY 2026 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मे 2026

 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) 27 एप्रिल 2026 रोजी “भारतात सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कचा प्रसार” या विषयावर एक सल्लामसलत पत्र जारी केले होते. या सल्लामसलत पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर अभिप्राय आणि सूचना सादर करण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 25 मे , 2026 आणि 8 जून, 2026 निश्चित करण्यात आली होती.

उद्योग संघटना आणि हितधारकांकडून अभिप्राय सादर करण्याची तारीख वाढवण्याबाबत प्राप्त झालेल्या विनंत्या लक्षात घेऊन, अभिप्राय आणि सूचना सादर करण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 1जून 2026 आणि 15 जून 2026, पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अभिप्राय आणि सूचना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात advbbpa@trai.gov.in वर पाठवाव्यात आणि त्याची एक प्रत jtadvbbpa-1@trai.gov.in वर पाठवावी. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी/माहितीसाठी, डॉ. अब्दुल कयूम, सल्लागार (ब्रॉडबँड आणि धोरण विश्लेषण), ट्राय (TRAI) यांच्याशी +91-11 20907757 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 

 * * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2264330) आगंतुक पटल : 60
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Punjabi , Gujarati , Kannada , Urdu , Bengali , Bengali-TR , Tamil