पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींवर आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद


देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध

प्रविष्टि तिथि: 21 MAY 2026 8:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मे 2026

 

पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार नागरिकांना नियमित ताजी माहिती देण्याचे प्रयत्न सातत्याने करत आहे. या संदर्भात, आज राष्ट्रीय माध्यम केंद्रात माध्यमांना माहिती देण्यात आली. या बैठकीत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांनी इंधनाची उपलब्धता, सागरी कामकाज आणि प्रमुख क्षेत्रांमध्ये स्थैर्य राखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांविषयी ताजी माहिती दिली.

अंमलबजावणी आणि देखरेख उपाययोजना 

  • एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात कारवाई सुरू आहे. गेल्या 3 दिवसांत, देशभरात 5000हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले.
  • त्याचप्रमाणे, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून अचानक तपासणी देखील सुरू असून, गेल्या 3 दिवसांत 3100 हून अधिक किरकोळ विक्रेते आणि एलपीजी वितरक केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी अचानक तपासणी अधिक कडक केली असून 463 एलपीजी वितरकांना दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच कालपर्यंत 81 एलपीजी वितरकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

एलपीजी पुरवठा

  • गैरवापर टाळण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) आधारित वितरणात सुमारे 96% वाढ झाली आहे. डीएसी ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त होतो.
  • गेल्या 3 दिवसांत सुमारे 1.32 कोटी एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगच्या तुलनेत सुमारे 1.34 कोटी सिलिंडर वितरित करण्यात आले.
  • काल, सुमारे 45.36 लाख एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगच्या तुलनेत सुमारे 47.51 लाख एलपीजी सिलिंडर वितरित करण्यात आले.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वितरणविषयक उपाययोजना:

  • गेल्या 3 दिवसांत 5 किलो वजनाचे सुमारे 1.87 लाख एफटीएल सिलेंडर्स विकले गेले.
  • दिनांक 3 एप्रिल 2026 पासून आतापर्यंत 5 किलो वजनाच्या एफटीएल सिलेंडर्सच्या विक्रीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी 14,500 पेक्षा जास्त जागरुकता शिबिरांचे आयोजन केले असून, या शिबिरांमध्ये आतापर्यंत 5 किलो वजनाच्या एकूण 2.34 लाख एफटीएल सिलेंडर्सची विक्रीदेखील झाली आहे.
  • कालच्या दिवसभरात 348 शिबिरांच्या माध्यमातून 5 किलो वजनाचे 4919 एफटीएल सिलेंडर्स विकले गेले.
  • मे-26 पासून एकूण 1,32,341मेट्रिक  टन व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली आहे.  
  • गेल्या 3 दिवसांत एकूण 23,588 मेट्रिक टन व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली.
  • गेल्या 3 दिवसांत,  सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी  वाहनांसाठी लागणाऱ्या सुमारे 963 मेट्रिक टन एलपीजीची विक्री केली.

नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तारविषयक उपक्रम

  • मार्च 2026 पासून सुमारे 7.64 लाख पीएनजी जोडण्या गॅसिफाय करण्यात आल्या आहेत आणि अतिरिक्त 2.81 लाख जोडण्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात आल्यामुळे या एकूण जोडण्यांची संख्या 10.45 लाखांवर पोहोचली आहे. तसेच, सुमारे 7.99 लाख ग्राहकांनी नव्या जोडण्यांसाठी नोंदण्या केल्या आहेत.
  • दिनांक 20.05.2026 पर्यंत 58,500हून अधिक पीएनजी ग्राहकांनी MYPNGD.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांच्या एलपीजी जोडण्या परत केल्या आहेत.

कच्च्या तेलाची स्थिती आणि तेलशुद्धीकरणविषयक कार्ये

  • केंद्रीय औषधनिर्मिती विभाग, केंद्रीय रसायने आणि पेट्रोकेमिकल्स(डीसीपीसी) विभाग, केंद्रीय उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन मंडळ (डीपीआयआयटी) यांच्याकडून करण्यात आलेल्या विनंत्यांच्या आधारावर एलपीजी साठ्यातून औषधनिर्मिती, रसायने आणि रंग या क्षेत्रांतील कंपन्यांना दर दिवशी 1120 मेट्रिक टन सी3-सी4 रेणूंचा पुरवठा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
  • दिनांक 01 मे 2026 पासून, मुंबई, कोची, विशाखापट्टणम, चेन्नई, मथुरा आणि गुजरात येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पांतून औषधनिर्मिती, रसायने आणि रंग या क्षेत्रांतील कंपन्यांना सुमारे 10600 मेट्रिक टन सी3-सी4 रेणूंची (प्रॉपेलीन आणि ब्युटीलीन) तसेच 3940 मेट्रिक टन ब्युटील अॅक्रिलेट यांची विक्री करण्यात आली आहे.

किरकोळ इंधन उपलब्धता आणि किंमतींबाबतचे उपाय

  • देशभरातील सर्व पेट्रोल पंप (किरकोळ विक्री केंद्रे) नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहेत.
  • पश्चिम आशियातील संकटामुळे कच्च्या तेलाच्या  किंमतींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसू नये, यासाठी केंद्र सरकारने हा भार स्वतः सोसण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात  प्रति लिटर 10 रुपयांची कपात करण्यात आली.
  • केंद्र सरकारने 15.05.2026 रोजीच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, डिझेलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून 16.50 रुपये, तर विमान इंधनावरील (एटीएफ) निर्यात शुल्क प्रति लिटर 33 रुपयांवरून 16 रुपये इतके कमी केले आहे. याशिवाय, पेट्रोलवर प्रति लिटर 3 रुपये निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे.
  • देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

सागरी सुरक्षा आणि नौवहन संचालन 

  • संबंधित क्षेत्रातील सर्व भारतीय खलाशी पूर्णपणे सुरक्षित आहेत. गेल्या 72 तासांत भारतीय ध्वज असलेल्या कोणत्याही जहाजाबाबत किंवा भारतीय कर्मचारी असलेल्या परदेशी जहाजाबाबत अनुचित घटनेची नोंद झालेली नाही.
  • नौवहन महासंचालनालय नियंत्रण कक्षाने काम सुरू केल्यापासून आतापर्यंत 10,106 फोन कॉल्स आणि 22,215 पेक्षा जास्त ईमेल्स हाताळले आहेत.  गेल्या 72 तासांत खलाशी, त्यांचे कुटुंबीय आणि सागरी क्षेत्रातील संबंधित घटकांकडून एकूण 404 फोन कॉल्स आणि 903 ईमेल्स प्राप्त झाले आहेत.
  • बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने नौवहन महासंचालनालयाच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 3,316 पेक्षा जास्त भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणले आहे. यामध्ये गेल्या 72 तासांत आखाती क्षेत्रातील विविध भागांतून सुरक्षितपणे परत आणलेल्या 99 खलाशांचा समावेश आहे.

 

* * *

सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/संजना चिटणीस/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2263922) आगंतुक पटल : 49
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam