सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
‘कार्यक्षम सेवा (देखभाल) अर्थव्यवस्थेची निर्मिती’, या विषयावर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे 22 मे 2026 रोजी दृकश्राव्य माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन
ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन (JEEVAN) अॅप आणि जेरियाट्रिक केअरगिव्हर्सबाबत माहितीसाठी शतायू (SHATAYU) डॅशबोर्ड चा केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते शुभारंभ होणार
प्रविष्टि तिथि:
21 MAY 2026 6:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मे 2026
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग, 22 मे 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता ‘कार्यक्षम केअर इकॉनॉमी, अर्थात सेवा (देखभाल) अर्थव्यवस्थेची निर्मिती’, या विषयावर दृकश्राव्य माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित करणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सहसचिव (ज्येष्ठ नागरिक) यांच्या स्वागतपर भाषणाने होईल, त्यानंतर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे सचिव सुधांश पंत यांचे भाषण होईल. सेवा अर्थव्यवस्थेमध्ये बालसंगोपन, वृद्धांची काळजी, दिव्यांग सहाय्य, आरोग्यविषयक घरगुती काळजी आणि घरगुती सेवांशी संबंधित उपक्रमांचा समावेश होतो. यात प्रामुख्याने घरातील महिलांद्वारे केली जाणारी बिनपगारी काळजी सेवा आणि औपचारिक आणि अनौपचारिक बाजारपेठांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सशुल्क सेवांचा समावेश आहे.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री बी. एल. वर्मा आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील उपस्थितांना संबोधित करतील.
या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांसाठी 'जीवन (JEEVAN)' मोबाईल ॲप्लिकेशन आणि ‘जेरियाट्रिक केअरगिव्हर्स’ म्हणजे वृद्ध व्यक्तींची काळजी घेणाऱ्यांविषयी माहिती देणाऱ्या 'शतायू (SHATAYU)' डॅशबोर्डचा शुभारंभ होईल. डॉ. वीरेंद्र कुमार आपल्या बीज भाषणात सेवा (देखभाल) परिसंस्था मजबूत करण्याच्या उद्देशाने मंत्रालयाने राबवलेल्या उपक्रमांची रूपरेषा मांडतील.
या कार्यक्रमात कर्नाटक आणि केरळम या राज्यांच्या ‘केअर इकॉनॉमी’मधील सर्वोत्तम पद्धतींवर सादरीकरण देखील होईल. या कार्यक्रमात सखोल चर्चेसाठी संकल्पनाधारित चार प्रमुख क्षेत्र निश्चित करण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्रालये/विभाग, राज्य / केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी, या क्षेत्रातील तज्ञ आणि शिक्षण तज्ञ या कार्यशाळेला उपस्थित राहतील. यावेळी प्रमुख धोरणात्मक मुद्दे, अंमलबजावणीतील त्रुटी, आगामी उपक्रम, सर्वोत्तम पद्धती आणि कृती करण्यायोग्य शिफारशी यावर विचारमंथन होईल.
तंत्रज्ञान आणि सामुदायिक सहभागाचा उपयोग करून काळजी सेवांसाठी एक व्यापक चौकट विकसित करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
* * *
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2263877)
आगंतुक पटल : 46